अतिवृष्टीमुळे चार चाकी वाहनाचे नुकसान तहसील प्रशासनाने केला पंचनामा
अतिवृष्टीमुळे चार चाकी वाहनाचे नुकसान तहसील प्रशासनाने केला पंचनामा
मानवत प्रतिनिधी : शहरातील मंत्री कॉम्प्लेक्स जवळील बडोदा बँकेसमोर लावलेल्या एम.एच.२२ यु ६८३५ या चार चाकी वाहनात २ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आलेल्या पुराचे पाणी शिरले . त्यामुळे या वाहनाचे मोठे नुकसान झाले असून तहसील प्रशासनाने पंचनामा केला.
पुराचे पाणी शिरल्याने सदरील गाडी पूर्णपणे बंद पडली आहे या संदर्भात भारत सोळंके यांनी न.पा.च्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांना निवेदन देत सदरील चार चाकी वाहनाच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती . त्यामुळे तहसील प्रशासनाने ४ सप्टेंबर रोजी मंत्री कॉम्प्लेक्स या ठिकाणी जाऊन या चार चाकी वाहनाची तपासणी करत पंचनामा केला यामध्ये पावसाचे पाणी या चार चाकी वाहनांमध्ये शिरले त्यामुळे वाहन पूर्णपणे बंद पडल्याचे समोर आले असल्याचा पंचनामा तलाठी नागरगोजे यांनी केला आहे यावेळी पंच म्हणून संतोष चव्हाण, रामदास कापसे उपस्थित होते