अण्णा भाऊ साठे जयंती समितीच्या अध्यक्षपदी क्रीडामंत्री संजय बनसोडे
अण्णा भाऊ साठे जयंती समितीच्या अध्यक्षपदी क्रीडामंत्री संजय बनसोडे
उदगीर,-लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली .
शहरातील नवीन विश्रामगृह येथे रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बन्सीलाल कांबळे होते. यावेळी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कारप्राप्त शेषेराव करखेलीकर, रमेश जोंधळे यांच्यासह प्रा. शिवाजी देवनाळे, जवाहरलाल कांबळे, सुनील दादाराव कांबळे, राजकुमार चव्हाण, संग्राम अंधारे, प्रा. अजित कांबळे, प्रा. बिबीनवरे, बालाजी रणदिवे, अॅड. व्यंकट कांबळे, अॅड. मारुती चव्हाण, प्रथमेश देवनाळे यांची उपस्थित होती.
यावेळी अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. विविध सामाजिक उपक्रमही यंदा घेतले जाणार आहेत. यावेळी अरविंद शिवाजी शिंदे, कनवर सकट, छाया कांबळे, रेणुका उफाडे, बालाजी विश्वनाथ कांबळे, धनराज सूर्यवंशी, नवनाथ जिवलगे, मारुती गायकवाड, संग्राम कांबळे, शांतिलाल कांबळे, ऋषिकेश लांडगे, देवीलाल कांबळे, सुशील सूर्यवंशी, पपू कांबळे, अनिल सोमवंशी, अंबादास कांबळे, पद्मसिंह करखेलीकर, सिद्धार्थ कांबळे, दुर्गा गोटमुखले, मनोज किंवडे करण अंधारे तानाजी भोसले, आनंद गुंडीले, सागर मसुरे, सुंदरम रणदिवे, साहिल मसुरे, देवा बेद्रे, जीवन मोटेवाड, रोशन जोंधळे, अनिकेत पांढरे, ऋषी कांबळे, बुद्धराज सुतार, प्रतीक मसुरे, अंबादास नाईक, प्रेम कांबळे, नागनाथ जरीपाटके, विश्वनाथ गायकवाड, राजू सूर्यवंशी अर्जुन जाधव, विशाल सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.