अंगणवाडी सेविकेच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल…
अंगणवाडी सेविकेच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल…
नेवासा प्रतिनिधी-नेवासा बु. येथील राजवाड्यातील अंगणवाडीत दि-02/07/2024/ रोजी सकाळी 10.15 वा सुमारास मी तसेच अंगणवाडी मदतनीस असे अंगणवाडी येथे असतांना अंगणवाडीच्या आतमध्ये सचिन रतन धोंगडे रा.नेवासा बु. हा आला व मला अंगणवाडीच्या वॉल कंपाउंडच्या चाव्या मागु लागला त्यावेळी मी त्यांना समजावुन सांगत होते कि ही जागा शासनाची असुन त्या जागेच्या वॉल कंपाउंडच्या चाव्या मी तुम्हाला देवु शकत नाही.त्याचा त्याला राग आल्याने त्याने माझ्या अंगावर धावुन येवुन माझा हातधरुन लज्ज्ञ्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन माझ्या हातातुन चाव्या हिसकावुन घेवून माझ्या अंगावर फेकुन मारल्या व मला म्हणाला कि मला या ठिकाणी आंबेडकरांचा पुतळा उभारुन त्या बाजुला बगीचा तयार करायचा आहे.तुला या जागेमध्ये नांदायचे आहे का याच ठिकाणी झोपायचे आहे.तु काय मला आडवी येवु नको.मी तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली.त्यांनतर त्याने मला धमकी दिली कि तु जर चाव्या या ठिकाणी ठेवुन गेली नाही तर तुला या ठिकाणी पुन्हा येवु देणार नाही.तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याने सचिन रतन धोंगडे रा.नेवासा बु.ता.नेवासा याच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.