पहिले राज्यस्तरीय काव्य संमेलन नृसिंहवाडी कोल्हापूर येथे संपन्न.
पहिले राज्यस्तरीय काव्य संमेलन कोल्हापूर नृसिंहवाडी येथील वासुदेव मंगल कार्यालयात नुकतेच पार पडले कवियों का आध्यात्मक कोल्हापूर प्रतिष्ठान या समूहाचे फित कापून उद्घाटन तसेच भारतीय कोल्हापूर मंचचे प्रतिनिधीक काव्यसंग्रह तसेच सौ रोहिणी अमोल पराडकर यांचा वैयक्तिक अभंग कौस्तुभ मणी या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
सर्व कवींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कवी संमेलनाचा मुख्य विषय पाणी वाचवा हा होता त्यावर वृषाली टाकळे रत्नागिरी, दत्तात्रय गुरव कोल्हापूर, प्रांजली चौधरी गोवा,सौ.रोहिणी पराडकर कोल्हापूर, नागरत्ना कुडतरकर गोवा, गोविंद दत्तात्रय पाठक बीड, प्रमिला कुलकर्णी छ. संभाजीनगर, दिपक पवार कोल्हापूर, सागर गुडमेवार पुणे आळंदी,डॉ. जेनेट बोर्जिस गोवा
सर्वांनी अतिशय सुंदर कविता सादर केल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली चौधरी हिने केले.
अमोल पराडकर यांनी अध्यक्ष स्थान भूषवले होते संस्थापक डॉ सागर गुडमेवार यांनी उद्घाटन केले आयोजक रोहिणी अमोल पराडकर यांनी प्रास्ताविक केले.