किशन उगले यांना श्री.संत नामदेव महाराज पुरस्काराचा मान

किशन उगले यांना श्री.संत नामदेव महाराज पुरस्काराचा मान
उदगीर | प्रतिनिधी
संत नामदेव महाराज प्रतिष्ठान, घुमान (अमृतसर, पंजाब) व संत नामा साहित्य मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्तरावर “अभंग रसग्रहण लेखन स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यभरातील तब्बल १,१७५ अभ्यासक आणि संतसाहित्यिकांनी सहभाग नोंदवून आपले लेखन सादर केले.
या स्पर्धेचा निकाल १५ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. यात लातूर जिल्ह्यातील शेकापूर येथील व व्यंकटराव देशमुख विद्यालय, बनशेळकी (ता. उदगीर) येथील शिक्षक किशन दत्तात्रय उगले यांनी प्रथम क्रमांक पटकावून “संत नामदेव महाराज पुरस्कार” मिळविण्याचा सन्मान प्राप्त केला.
पुरस्कार वितरण सोहळा अमृतसर (पंजाब) येथे संपन्न झाला. यावेळी पंजाबचे राज्यपाल मा. श्री. बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते किशन उगले यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, पंजाबी पगडी, प्रमाणपत्र व शाल प्रदान करून गौरविण्यात आले.
संत साहित्य क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सहा सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या जयंती महोत्सवात उगले यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे