भोकर तालुक्यातील 66 गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण घोषित

भोकर तालुक्यातील 66 गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण घोषित
**************************
33 गावात महिला राखीव
**********
अनु जाती 10 अनु जमाती 14 ओबीसी 18 सर्वसाधारण 24
***************
(भोकर तालुका प्रतिनिधी) निवडणूक विभाग व जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार भोकर तालुक्यातील 66 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 1 जुलै 2025 रोजी पार पडली यामध्ये अनुसूचित जातीसाठी 10 अनुसूचित जमातीसाठी 14 ओबीसीसाठी 18 तर सर्वसाधारण जागेसाठी 24 जागा राखीव करण्यात आले आहेत
भोकर येथील उपविभागीय कार्यालयात 1 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंग शेट्टी यांच्या मार्गदर्शनानुसार तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी सोडत पद्धतीने आरक्षण चिठ्ठीद्वारे काढून घोषित केले.
अनुसूचित जातीसाठी पाळज, बल्लाळ, हळदा, दिवशी खु., मातुळ महिला राखीव सोमठाणा, रहाटी बु. जाकापूर, सावरगाव माळ,धानोरा. अनुसूचित जमातीसाठी बोरवाडी, गारगोटवाडी(दी), भरभुशी, धावरी,बु. वाकद, डोरली,पा, गारगोटवाडी पा, महिला राखीव आमदरी, नागापूर, जामदरी, रिठा, नारवट, समंदरवाडी, ताटकळवाडी, नागरिकांचा मागास प्रवर्ग रावणगाव, देवठाणा, दिवशी बु. जांभळी, महागाव,पोमणाळा, बटाळा सायाळ, बेंद्री महिला राखीव लामकानी,ईळेगाव, धारजणी, डौर, सोनारी, धावरी खु. सावरगाव मेट, नांदा, हसापूर, सर्वसाधारण साठी पाकी, खडकी, खरबी,मोघाळी, किनी, नांदाखु.,हाडोळी, पिंपळढव, बेबर,चिंचाळा, भोशी, आमठाणा महिला राखीव पांडुरना, थेरबन, चीदगिरी, नांदाबु.,कांडली, रायखोड, कोळगावबु.,कामणगाव, रेणापूर, बोरगाव,कोळगावखु. लगळूद आदी 66 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण चिठ्ठी द्वारे काढण्यात आले यावेळी तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी तालुक्यातील सरपंच उपसरपंच नागरिक उपस्थित होते