लोह्यात गोमातेच्या वासराचे बारसे सोहळा उत्साहात संपन्न

लोह्यात गोमातेच्या वासराचे बारसे सोहळा उत्साहात संपन्न
— हिंदू संस्कृतीच्या जतनाचा आगळावेगळा प्रेरणादायी उपक्रम
लोहा, (प्रतिनिधी, एकमुख न्यूज | www.ekmukh.com)
देवाची पूजा, देवतेचा जयघोष आपण ऐकत आलो आहोत, पण गोमातेच्या वासराचे बारसे सोहळा तुम्ही कधी पाहिला आहे का? लोहा शहरातील देऊळगल्ली परिसरात भोस्कर कुटुंबीयांनी गोमातेच्या वासराचे विधिवत नामकरण सोहळा पार पाडत एक आगळावेगळा संस्कार घडवून आणला.
२६ जून रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात पारंपरिक पद्धतीने सोवळे धारण करून मंत्रोच्चार, कलश पूजन, गंध, फुलांची सजावट, रत्नजडीत अलंकार, नमन, गीतगायन, नैवेद्य अशा सर्व पारंपरिक विधींचा समावेश होता. हा सोहळा केवळ नामकरण नसून गोमातेच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्वाचा गौरव करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.
गोमातेबाबत असलेला आदरभाव, तिच्या सेवेचा ध्यास, तिच्या शरीरातील पंचमहाभूतांपासून होणारे फायदे (दूध, गोमूत्र, शेण) याचे विवेचन यामध्ये करण्यात आले. उपस्थित महिलांनी भक्तिभावाने गोगीतांचे सादरीकरण करत गोमातेच्या चरणी वंदन केले. या प्रसंगी तेहतीस कोटी देवतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोमातेला मान देत “गोमाता बचाव – देश बचाव” असा संदेशही देण्यात आला.
उपस्थित मान्यवर:
यावेळी नगरसेविका सौ. गोदावरीताई सूर्यवंशी, सविता भोस्कर, सौ. सौभिकुताई रहाटकर, सौ. संगीता चन्नावार, सौ. भाग्यश्री रेखावार, इंदुताई रहाटकर, सुनंदा रहाटकर, उमा राहाटकर, संगीता चालिकवार, ज्योती आंबेकर, वैशाली भातलवंडे, पल्लवी बिडवई, बालीताई बंडेवार, शिल्पा बच्चेवार, लता किटे, सुनंदा बच्चेवार, ज्योती पेटगुलवार, आरती भोसकर, प्रिया रुद्रवार, सुनीता रहाटकर, शोभा अमिलकंठवार, निर्मला काचावा, राधिका पाथरकर आदी मान्यवर महिला भगिनींची उपस्थिती होती.
— प्रतिनिधी, एकमुख न्यूज | www.ekmukh.com