शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची झाली सुरुवात…..
शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची झाली सुरुवात…..
वसमत…… प्रतिनिधी…..
वसमत शहरातील नागरिक, महिला,व्यापारी, पत्रकार यांनी शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात यावे यासाठी प्रशासनाला मोर्चा द्वारे निवेदन दिले होते. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तहसीलदार सौ.दळवी मॅडम यांनी नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्या सोबत सदरील रस्त्यांची पाहणी केली व रस्त्यावरील अतिक्रमण ताबडतोब हटविण्याच्या सुचना स्थानिक प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार नगरपरिषदेने लाऊडस्पिकरच्या साहृयाने संबंधितांनी रस्त्यांवरील अतिक्रमण स्वतः होऊन काढून घ्यावे अशी सूचना केली होती.
काही जणांनी काल स्वतः गाडे हटवले. आज प्रशासनाने जय्यत तयारीनिशी व कर्मचाऱ्यांच्या सह अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली. पाहता पाहता पोलीस स्टेशन ते कारंजा चौक येथील दोन्ही बाजुकडील फळगाडे, भाजीचे गाडे, छोटे छोटे ठेले, इतर दुकाने मालकांनी स्वतः उचलली.यामुळे आज पोलीस स्टेशन ते कारंजा चौक या रस्त्यावर नागरिकांना मोकळा श्वास घेता आला, वाहतुकीची कोंडी दिसली नाही.
आज नागरिकांना फळे व भाजीपाला घेण्यासाठी अडचण आली.पण तरीसुद्धा सदरील कारवाई बद्दल नागरिकांनी प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत. फळे व भाजीपाला विक्रीसाठी नगरपरिषदेच्या मागील जागेवर विक्रीसाठी जागा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने कळवले आहे. प्रशासनातर्फे यापुढेही ही मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.