पत्रकार बी.आर.पांचाळ यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर कर्मयोगी” राष्ट्रीय “पुरस्कार घोषित
पत्रकार बी.आर.पांचाळ यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर कर्मयोगी” राष्ट्रीय “पुरस्कार घोषित
***************
भोकर( तालुका प्रतिनिधी) पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल भोकर येथील ज्येष्ठ पत्रकार बी. आर. पांचाळ यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या वतीने दिला जाणारा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर कर्मयोगी राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला असून पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला 5 जानेवारी 2025 रोजी नाशिक येथे पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
पत्रकारितेच्या 35 वर्षाच्या काळात बी.आर.पांचाळ यांनी सामाजिक लिखाण करून सर्वसामान्यांना न्याय दिला. ग्रामस्वच्छता अभियान, स्वच्छ सुंदर गाव, व्यसनमुक्ती, जलसंधारण, वृक्षारोपण, पाणी आडवा पाणी जिरवा, आदर्श गावांची संकल्पना, आरोग्य आणि शिक्षण, शेतकरी व महिलांचे प्रश्न, रखडलेले ग्रामविकासाचे प्रश्न अशा अनेक विषयावर लिखाण करून सामाजिक बांधिलकी जोपासली त्यांच्या उत्कृष्ट लिखाणाची दखल घेऊन यापूर्वी त्यांना जिल्हास्तरीय, मराठवाडा स्तरीय, पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शासनाचे व विविध संस्थांचे देखील पुरस्कार त्यांना मिळाले आहेत,नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा कर्मयोगी बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय पुरस्कार त्यांना नुकताच घोषित झाला असून पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला 5 जानेवारी 2025 रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार आहे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी पत्र पाठवून पुरस्काराची घोषणा केली असून बी. आर पांचाळ यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे