आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताचालू घडामोडीनिवडणूकराजकारणसरकारी योजना

लोहा विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज  दाखल नाही: २१ जणांचे ५३ नामनिर्देशन पत्र खरेदी 

लोहा विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज  दाखल नाही: २१ जणांचे ५३ नामनिर्देशन पत्र खरेदी

लोहा दि.22 ऑक्‍टो.
लोहा विधानसभा मतदार संघात पहिल्‍याच दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही पण 21 जणांनी 53 नामनिर्देशन पत्र घेतले आहेत अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांनी दिली.
विधानसभा निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन दाखल करण्‍यास आज पासून प्रारंभ झाला आहे. दाखल करण्‍यास आज पासयून प्रारंभ झाला आहे. सुट्टीचे दिवस वगळता 29 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 30 ऑक्‍टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी तर 4 नोंव्‍हेबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्‍याची अंतिम मुदत आहे. मतदान 20 नोंव्‍हेबर रोजी होणार आहे.स्वतंत्र कक्ष स्थापण करण्यात आला असून तेथे नामांकन खरेदी, तपासणी व स्वीकारले जाणार  आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्‍या निर्देशांचे पालन व्‍हावे. यासाठी सर्वांनी जबाबदारी पार पाडावी असे निवडणूक निर्णय अधिकारी अरूणा संगेवार यांनी सुचना दिल्‍या आहेत. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार विठ्ठल परळीकर, तहसिलदार,कंधार रामेश्‍वर गोरे, नायब तहसिलदार उर्मिला कुलकर्णी, रेखा चामनर, संदीप हाडगे, अशोक मोकले, राजेश पाठक,राजेश गायंगी सहाय्यक महूसल अधिकारी,  श्रिनिवास ढगे,हरिराम राऊत,तिरूपती मुंगरे, ईश्‍वर धुळगंडे,मन्‍मथ थोटे, अशोक मोरे,महेंद्र कांबळे,बी.बी.शेख. विलास चव्हाण, सूर्यकांत पांचाळ, दयानंद मळगे, मुनींत गायकवाड, यासह कर्मचारी निवडणूक प्रक्रिया व्‍यवस्थित पार पाडण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहेत.

२१ जणांचे ५३ अर्ज विक्री.

पहिल्‍याच दिवशी 21 जणांनी 53 अर्जाची विक्री झाली आहे. माजी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.श्‍यामसुंदर  शिंदे, प्रविण पाटील चिखलीकर, प्रा.मनोहर धोंडे, एकनाथ पवार, शिवा नंरगले, रंगनाथ भुजबळ, आशाताई शिंदे, रामचंद्र येईलवाड सतिष पाटील उमरेकर या प्रमुख उमेदवारांचा यात समावेश आहे.  पहिला नामांकन अर्ज खरेदी संजय भालेराव यांनी केला त्‍या शिवाय आनंदा नवघरे विनायक लोहकरे (शेलगाव) किशन डफडे (कंधार) निलेश गोरे (कंधार) ग्‍यानोबा घोडके (पानभोसी) शेख रहिमान सतार, बालाजी चुक्‍कलवाड (पाताळगंगा) रंगनाथ गजले (निळा) भारत कोपनर (पांगरी) योगेश इंगळे(निळा) बालाजी गाडेकर (बरळी) हरि पाटील शिंदे (हळदव) प्रदीप चिखलीकर (चिखली) ज्ञानेश्‍वर चोंडे बालाजी एकलारे, दिंगबर उगले, सय्यद नईम, खादर मामु लदाम (लोहा) यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button