आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रनिवडणूकराजकारण

लोहा – कंधार विधानसभेसाठी अनेक इच्छूकांचे गुडघ्याला बाशिंग !

लोहा – कंधार विधानसभेसाठी अनेक इच्छूकांचे गुडघ्याला बाशिंग !

मतदारसंघातील जनता ही विकासात्मक दृष्टिकोन असणाऱ्या उमेदवाराला संधी देणार ?

लोहा : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेची निवडणुक काही महिण्यांवर येवून ठेपली आहे. विविध पक्षांचे उमेदवार मतदारसंघात गावोगावी, वाडी, तांड्यावर जाऊन गाठीभेटी घेत फिरत आहेत. महाविकास आघाडी व महायुती कडून उमेदवारी आपणासच मिळणार असे सांगत चक्क गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत. त्यामुळे २०२४ ची लोहा – कंधार विधानसभेची निवडणुक ही चांगलीच रंगतदार होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

88 लोहा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत एकमेव वंचित बहुजन आघाडीकडून शिवा नरंगले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच शिवाय नरंगले थेट कामाला लागले आहेत. मतदारसंघात आर्शिवाद यात्रा काढली.

लोहा – कंधार मतदारसंघाचे नेतृत्व सध्या शेतकरी कामगार पक्षाचे आ. श्यामसुंदर शिंदे हे करीत आहेत, नुकतेच नांदेड लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले भाजपाचे माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी लोहा – कंधार मतदारसंघाच्या निवडणुक आखाड्यात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जाते आहे. महाविकास आघाडी कडून उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक एकनाथ दादा पवार यांनी तर लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघात शिवसंवाद दौरा सुरु करुन मतदार संघ पिंजून काढला आहे. माजी आ. शंकरअण्णा धोंडगे हे एम आर.एस. पक्षातर्फे निवडणुक लढविणार की, ऐनवेळी तिसरी आघाडी कडून मैदानात उतरणार, सेवा जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी देखील पत्रकार परिषद घेत येणारी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. तर शिवसेना (शिंदे) गटाकडून उमेदवारी आपल्यालाच मिळणार म्हणून बाळू पाटील कऱ्हाळे हे मोर्चेबांधणी करीत आहेत.

सध्या आ. श्यामसुंदर शिंदे जरी या मतदारसंघाचे नेतृत्व करीत असले तरी त्यांच्या पत्नी शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई शिंदे या येणाऱ्या विधानसभेच्या उमेदवार असल्याचे वाढदिवसाच्या दिवशी जाहीर केले. माजी खा. प्रतापराव चिखलीकरही विधानसभेचे उमेदवार असल्याचे मानले जात असल्याने या बहिण-भावात लढत होणार ! हे जवळपास निश्चित आहे. या बहिण भावाच्या लढतीत एकनाथ दादा पवार कुठे कमी नसल्याने लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघ मराठवाड्याचे लक्ष वेधून घेत आहे.

लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होईल असे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत अनेक मुद्दे हे कळीचे ठरणार असले तरी कै. केशवराव धोंडगे यांच्या नंतर मतदारसंघात मनावा तसा विकास झाला नाही. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही मतदारसंघातील अनेक वाडी – तांड्यावर लाईट, पिण्याचे पाणी, दळणवळणासाठी आजही पक्के रस्ते नाहीत. विकास कामे केल्याचा दावा करणाऱ्यानी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचे मतदारसंघातील जनता बोलत आहेत. येणाऱ्या काळात विकासात्मक दृष्टिकोन असणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मतदारसंघातील जनता राजरोसपणे सांगत आहे.

मराठा व ओ.बी.सी आरक्षणाचा मुद्दा ही कळीचा ठरु शकतो ?

मराठा समाजाला सगेसोयरे हा अध्यादेश काढून सरसगट ओ.बी.सी तून आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे हे मराठवाड्यात दौरा करून पुन्हा उपोषण करत आहेत तर मराठा समाजाचा सरसगट ओ.बी.सी.त समावेश करु नये म्हणून हाके हे महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. हे मुद्दा धरुन लोहा – कंधार मतदारसंघातील ओ.बी.सी. समाजाने बैठक घेऊन ओ.बी.सी. समाजाचा एकच उमेदवार देऊन तो निवडून आणण्यासाठी निर्धार केला आहे. यावर मराठा समाजातील नेते काही प्रतिक्रिया देत नसले तरी येणाऱ्या विधानसभेला आरक्षणाचा मुद्दा हा कळीचा ठरु शकतो.भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुर्यवंशी यांनी आगामी निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपाची उमेदवारी मागीतली आहे याची चर्चा मतदारसंघात होत आहे.
विधानसभा निवडणुक जाहीर होण्यास काही दिवसाचा अवधी शिल्लक राहिला असून त्या अनुषंगाने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक तयारी करीत असल्याचे दररोज समोर येत आहेत

तूर्तास कोणत्या पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार ? हे जरी निश्चित नसले तरी अनेक उमेदवारांनी मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून आपणच महाविकास आघाडी व महायुती कडून उमेदवार आहोत, असा आव आणत मतदारसंघात फिरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button