मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात भोकर येथील शाहू विद्यालयास विभागातून तृतीय पारितोषिक
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात भोकर येथील शाहू विद्यालयास विभागातून तृतीय पारितोषिक
****************
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार वितरण
***************
भोकर- (तालुका प्रतिनिधी. )येथील श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आपल्या सातत्यपूर्ण शैक्षणिक कामगिरीसाठी सुपरिचित आहेच. पण सहशालेय उपक्रमात शाहूने केलेल्या कर्तबगारीचा ठसा विभागीय पातळीवर देखील उमटला असून ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात शाहू विद्यालयाला विभागातून तिसरं पारितोषिक जाहीर झालं आहे. येत्या १४ ऑक्टोबरला मुंबईत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘शाहू-परिवारा’ला हे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
भोकर सारख्या ग्रामीण भागात कै. बाबासाहेब गोरठेकर यांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. कै बापूसाहेब गोरठेकर यांच्या काळात संस्थेने उत्तरोत्तर प्रगती केली. तेव्हा पासून शाहूने कधीच मागं वळून पाहिलं नाही. शैक्षणिक, सहशैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील असंख्य उच्चांक शाहूने आपल्या नावावर नोंदवले आहेत. शाहूच्या यशात शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव शिरिषभाऊ गोरठेकर, संचालक कैलासभाऊ गोरठेकर, शिक्षण उपसंचालक मोरे , शिक्षण सहसंचालक डॉ दत्तात्रय मठपती, शिक्षणाधिकारी (मा) माधव सलगर, शिक्षणाधिकारी(प्रा) सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी पाचंगे, उपशिक्षणाधिकारी बनसोडे, विस्तार अधिकारी बसवदे, गट शिक्षणाधिकारी गुट्टे, विस्तार अधिकारी श्रीमती गोणारकर आदींनी प्राचार्य संजय देशमुख कामनगावकर व शाहू परिवाराचे अभिनंदन केले आहे.