उदगीर मध्ये समाजवादी पार्टीच्या शाखा फलकाचे धोंडीहिप्परगा येथे उद्घाटन
उदगीर मध्ये समाजवादी पार्टीच्या शाखा फलकाचे धोंडीहिप्परगा येथे उद्घाटन
उदगीर प्रतिनिधी : समाजवादी पार्टी लातूर जिल्हाध्यक्ष मा. दयानंदराव तरटे, राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. विजयकुमार पाटील गणेशपुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उदगीर तालुक्यातील धोंडिहिप्परगा येथे पार्टीच्या शाखेच्या फलकाचे उद्घाटन झाले.
या वेळी गावातील प्रमुखांच्या उपस्थितीत धोंडिहिप्परगा गावचे रहिवाशी श्री गोपीनाथ बिरादार यांची लातूर जिल्हा समाजवादी पार्टीच्या उपाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्षांनी सर्व प्रमुखांच्या उपस्थितीत दिले. सर्वाच्या वतीने श्री बिरादार यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. गावकऱ्यांच्या वतीने उपस्थित, डॉ. विजयकुमार पाटील, दयानंद तरटे, नामदेवराव तिकटे, बापुराव शेटकार, आशोक राठोड, सुनिल राठोड यांचा सत्कार करण्यात आले. समाजवादी पार्टीचे विचार सामान्य नागरीकांच्या हिताचे संरक्षण करणारे व समता मानणारे, लोकशाही मजबुत करणारे विचार असल्याचे आपल्या भाषणातून मांडले. धोंडिहिप्परगा गावातील प्रमुख रहिवाशी जेष्ठ व युवक कार्यकत्यांनी समाजवादी पार्टीचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन व आभार श्री लक्ष्मण बिरादार यांनी केले. कार्यक्रमास गावातील नागरीक, बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्री गोपनाथ बिरादार व त्यांच्या सहकार्यानी मेहनत घेतले.