मगर सावंगीला शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना
मगर सावंगीला शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना
मानवत प्रतिनिधी
आज दिनांक 5/10/2024 शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंगी मगर ता मानवत येथील शाळा व्यवस्थापन समिती ची निवड खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्ष म्हणून श्री बालासाहेब परमेश्वर मगर व उपाध्यक्ष म्हणून श्री योगेश बालासाहेब मगर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर सदयस म्हणून श्री गणेश महादेव मगर, श्री ज्ञानेश्वर विष्णुपंत मगर, श्री महादेव गंगाधर ढगे,श्री विठ्ठल निवृत्ती मगर, श्री डिगंबर दत्ता घनवटे, सौ अश्विनी गोविंद हरणे, सौ शितल पांडुरंग मगर,सौ. सोनाली रामदास मगर, सौ सुनीता विलास मगर, सौ सुनीता प्रकाश बुरखुंडे, सौ आशामती रावसाहेब कांबळे तसेच सदर निवडी साठी गावचे सरपंच श्री मुकुंद नानासाहेब मगर, भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष श्री विकास नारायण मगर, श्री श्रीधर माणिकराव मगर,श्री दत्ता अश्रोबा घनवटे, श्री विष्णु दामोदर ढगे, श्री गोविंद रामभाऊ मगर, श्री सुभाष विठ्ठल मगर,श्री महादेव विनायक मगर, श्री मुंजा रावण मगर, श्री बाळू मोतीराम गिरी, श्री भगवान नाईक या सह गावातील नागरिक उपस्थित होते. सर्व नियुक्त सद्यस्य यांचे तसेच सर्वं उपस्थितांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री विशाल माकुडे सर यांनी आभार मानले . सदर प्रक्रिये साठी शाळेतील शिक्षकवृंद श्री वराट सर, श्रीमती गायकवाड मॅडम, सौ गिरी मॅडम व श्रीमती लोखंडे मॅडम यांचे सहकार्य लाभले.