श्रीदेवी शेंडगे यांना एम. एस. सी. नर्सिंग पदवी प्रदान.
श्रीदेवी शेंडगे यांना एम. एस. सी. नर्सिंग पदवी प्रदान
****************
भोकर (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील मौजे धानोरा येथील श्रीदेवी प्रदीप शेंडगे यांनी एम एस सी नर्सिंग विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याने त्यांना नागपूर येथे एका विशेष समारंभात पदवी प्रदान करण्यात आली.
डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे शासकीय सेवेत परिचर्या पदावर कार्यरत असताना आपला कौटुंबिक भार सांभाळत पुढील शिक्षणासाठी एम एस सी नर्सिंग कोर्स करण्यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय नागपूर येथील परिचर्या महाविद्यालयात सायकिया ट्रिकचे पदवी आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर व मेहनतीच्या बळावर मिळविले 27 सप्टेंबर रोजी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयाचे अधीक्षक राज गजभिये प्राचार्य प्रकाश मकासरे व अन्य मान्यवरांच्या हस्ते सायकिया ट्रिकची पदवी प्रदान करण्यात आली या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.