आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रसामाजिक कार्य

स्त्री जीवनाचा अर्थ कृतीतून सांगणार्‍या ” सौ. ज्योतीताई खोडसकर”

स्त्री जीवनाचा अर्थ कृतीतून सांगणार्‍या ” सौ. ज्योतीताई खोडसकर”

माता-पित्याच्या स्मरणार्थ वृध्दांना 

अन्नदानासह केले जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

उस्माननगर ( गणेश लोखंडे)
“स्त्री…! निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न…! निसर्गत:च कोमलता आणि सौंदर्याचं अभूषण लाभलेली. काही जणी निसर्गानं दिलेली ही आभूषणं सांभाळता-सांभाळता मेटाकुटीला येतात, काही जणी ढाल म्हणून या आभूषणांचा वापर करतात तर, काही काही जणी निसर्गानं ही आभूषणं आपल्याला का दिली नाहीत म्हणून आयुष्यभर हळहळत असतात…! इतकाच अर्थ आहे का स्त्री जीवनाचा ? ज्यांना स्त्री जन्माचा अर्थ कळतो त्या आभाळाएवढं काम करून ठेवतात… त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि आपणही समाजाचे काही देणे लागतो हा भाव जागृत व्हावा हा त्यामागील हेतू असतो”. असाच हेतू मागील तीन वर्षापासून माजलगाव ( जि. बीड)च्या सौ. ज्योती प्रकाशराव देशमुख (खोडसकर) या जोपासत आहेत. दर वर्षी त्या आपल्या मात्या-पित्यांच्या स्मरणार्थ वृध्दाश्रमातील अनाथ वृध्दांमध्ये ज्योतीताई त्यांच्या माता-पित्यांचा शोध घेत अशा लोकांसाठी अन्नदान, त्यांच्या नित्योपयोगी लागणार्‍या जीवनावश्यक वस्तू पुरवणे आदी काम करत असतात.
यंदाही सौ. ज्योतीताई देशमुख (खोडसकर) यांनी सोमवारी (दि.२३ सप्टेंबर) रोजी पाथरी तालुक्यातील ओंकार वृध्दाश्रमातील ३५ अनाथ वृध्द स्त्री-पुरूषांना अन्नदान करून, आश्रमातील या लोकांच्या भोजनासाठी खुर्च्या आणि टेबल देत आपल्या स्त्रीधर्माचे पालन केले. गेल्या तीन वर्षापासून त्यांचा हा उपक्रम अविरतपणे चालू असून भविष्यातही तो नियोजनाप्रमाणे चालूच राहिल असे ज्योतीताईंनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले. दरम्यान, त्यांच्या या उपक्रमाचे ओंकार वृध्दाश्रमाचे संस्थापक डॉ.जगदिश शिंदे यांनी कौतुक केले असून, सामाजिक बांधीलकी जोपासणारी अशी मंडळी समाजातील असतातील तर कुणी अनाथ होण्याचे काही कारणच राहणार नाही असे भावनिक मत त्यांनी व्यक्त केले.
पाथरी पासून तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या ओंकार वृध्दाश्रमात पार पडलेल्या आजच्या अन्नदान उपक्रमास स्व. वि.मा. खोडसकर गुरूजी स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. प्रकाश खोडसकर, समग्र क्रांती साप्ताहिकाचे संपादक पराग खोडसकर, सौ. अनघा पराग खोडसकर, प्रभुप्रसाद माध्यम समुहाचे परमेश्वर लांडगे, आंबादास देशमुख, भारतीय आयुर्विमा मंडळाचे ज्ञानोबा भोसले आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सर्व व्यवस्थापन ओंकार वृध्दाश्रमाच्या व्यवस्थापिका गीताताई सोगे आणि त्यांच्या टीमने केले. आश्रमातील वृध्द महिला-पुरूषांनी खोडसकर परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button