भोकर मध्ये लाडक्या बहिणींची केवायसी साठी एसबीआय बँकेत लांबच लांब रांग; अपुरे कर्मचारी असल्याने अडचण
भोकर मध्ये लाडक्या बहिणींची केवायसी साठी एसबीआय बँकेत लांबच लांब रांग; अपुरे कर्मचारी असल्याने अडचण
**************
भोकर( तालुका प्रतिनिधी)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी अर्ज करून काही महिलांचे खाते केवायसी केले नसल्याने पैसे उचलता येत नाही त्यासाठी भोकर येथील एसबीआय बँकेसमोर सकाळी 9 वाजल्यापासूनच लांब लांब रांगा लाडक्या बहिणीने लावल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाने 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली असून दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत अर्ज भरणाऱ्या काही महिलांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये खात्यात जमा होऊन मिळाले देखील आहेत मात्र काही महिलांचे पैसे बँकेतील खात्याची केवायसी न केल्यामुळे अडकून पडले आहेत काही महिलांचे अर्ज त्रुटी मध्ये आले आहेत पुन्हा अर्ज भरणे व बँकेची केवायसी करण्यासाठी भोकर येथील एसबीआय बँकेसमोर लाडक्या बहिणींची मोठी गर्दीच गर्दी दिसून येत आहे अर्ज भरण्यासाठी सुद्धा गर्दी दिसत आहे.
एसबीआय बँकेत अपुरे कर्मचारी ;महिलांची हेळसांड
***************
भोकर तालुक्यात लाडक्या बहिणींचे मोठ्या प्रमाणावर अर्ज भरण्यात आले असून काही अर्ज त्रुटी मध्ये आले आहेत कागदपत्र अभावी काहींचे पैसे पडले नाहीत तर काहीं महिलांच्या खात्यावरील पैसे केवायसी न केल्यामुळे उचलता येत नाही केवायसी करण्यासाठी भोकर एसबीआय बँकेमध्ये सकाळी नऊ वाजल्यापासूनच महिलांची मोठी रांग लागलेली दिसत आहे केवायसी करण्यासाठी तीन ते चार दिवस चकरा माराव्या लागत आहे एसबीआय बँकेमध्ये अपुरे कर्मचारी असल्यामुळे केवायसी वेळेवर होत नाही बँकेसमोर रस्त्यातच महिलांना बसून राहावे लागत आहे महिलांची हेळसांड होऊ नये म्हणून बँकेच्या वतीने कर्मचारी वाढवणे गरजेचे आहे व काही टेबल स्वतंत्र महिलांच्या कामासाठी करणे गरजेचे आहे मात्र तसे न केल्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे काही वृद्ध महिला देखील या त्रासाला कंटाळल्या आहेत