तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी संजय गांधी निराधार समितीने घेतली आढावा बैठक
तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी संजय गांधी निराधार समितीने घेतली आढावा बैठक
लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रस्तावावर झाली चर्चा
मानवत : येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी दाखल केलेल्या प्रलंबित प्रस्तावासंदर्भात नवनिर्वाचित समितीने बुधवारी आढावा घेतला.
मागील पाच वर्षांपासून मानवत तालुका संजय गांधी निराधार समितीची नियुक्ती रखडली होती माञ नुकतीच नऊ सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष अमोल कदम सदस्य कविता धबडगे, मीरा काळे, किशोर चव्हाण, हबीब भडके , निलेश यादव, कल्याण देशमुख, नागनाथ कुऱ्हाडे, शिवाजी वरखडे, ज्ञानेश्वर भिसे यांनी तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी दाखल केलेल्या प्रस्ताव संदर्भात चर्चा करून संबंधित विभागाकडून नव्याने दाखल झालेले, प्रलंबित प्रस्ताव, त्रुटीचे प्रस्ताव, उत्पन्नाचा दाखला, या सर्व संदर्भात संजय गांधी निराधार योजना विभागाकडून माहिती घेऊन आढावा घेतला. सुरुवातीला नवनिर्वाचित समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांचा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी सत्कार करून स्वागत करीत संजय गांधी निराधार विभागातील विविध योजनांची माहिती सदस्यांना दिली.
30 सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन
संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यांनी लाभार्थ्यांनी दाखल केलेल्या प्रलंबित प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर हे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात यावी अशी मागणी समिती अध्यक्ष आणि सदस्यांनी केल्यानंतर प्रस्तावना मान्यता देण्यासाठी 30 सप्टेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आल्याचे समितीचे सचिव तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी जाहीर केले.
या बैठकीत 31 ऑगस्ट पर्यंत आलेले लाभार्थ्यांचे अर्ज ठेवण्यात येणार आहेत.