आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्तासामाजिक कार्य

मानवतला गणेश विसर्जन मिरवणूक थाटात संपन्न

मानवतला गणेश विसर्जन मिरवणूक थाटात संपन्न
प्रसादाच्या स्टॉलचा भक्तांनी लुटला आनंद

मानवत प्रतिनिधी : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात, ढोल ताशांच्या निनादात, गुलालाची उधळण करीत मंगळवारी ता १७ गणरायाला निरोप देण्यासाठी मोठया उत्साहात शहरात निघालेली विसर्जन मिरवणूक तब्बल ७ तास चालली. मिरवणुकीदरम्यान विविध गणेश मंडळांनी व सामाजिक संघटनांकडून ठेवण्यात आलेल्या विविध स्टॉल वरील प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती .
यावर्षी शहरात श्री गणेश नोंदणीकृत गणेश मंडळाची संख्या ४० तर तालुक्यातील ग्रामीण भागात ७२ असे एकूण ११२ ची स्थापना करण्यात आली होती . मंगळवारी ता १७ शहरात सकाळपासूनच छोट्या गणेश मंडळांनी वाजत गाजत श्री चे विसर्जन मोठ्या थाटात केले . दुपारी ४च्या सुमारास मुख्य मिरवणुकीला शिस्तीत सुरुवात झाली . सर्वच गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डिजेमुक्त मिरवणूक काढली . ढोल ताशांच्या गजरात मुख्य रस्त्याने गणपती विसर्जन मार्गे निघालेल्या या मिरवणुकीत अनेक गणेश मंडळांनी आकर्षक सजावट व देखावे केले होते.
मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस निरीक्षक संदीप बोरकर , तहसीलदार पांडुरंग माचेवाड, पालिकेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे , नायब तहसीलदार जिवन धारसुरकर यांच्यासह शांतता समितीच्या सदस्यांनी मिरवणुकीदरम्यान मोलाची भूमिका बजावली.

प्रसादाच्या स्टॉलवर अलोट गर्दी
शहरातील मुख्य रस्त्यासह विसर्जन मिरवणूक मार्गावर अनेक गणेश मंडळाच्या व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विसर्जन मिरवणूक व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी तरुण, तरुणी, महिला व आबालवृद्ध मोठ्या संख्येने आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button