आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताराजकारणसरकारी योजनासामाजिक कार्य

शासकीय आय.टी.आय. मानवत येथे संविधान मंदीराचे ऊद्घाटन

शासकीय आय.टी आय. मानवत येथे संविधान मंदीराचे ऊद्घाटन

मानवत प्रतिनिधी : दि १५ सप्टेंबर रविवारी शासकिय आय टी आय मानवत येथे संविधान मंदिराचे ऊद घाटन श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी नगर परिषद मानवत यांचे हस्ते व प्रमुख वक्ते शिक्षक आनंद नांदगावकर ‘गट निदेशक कल्याण पटेकर व सर्व निदेशक’ कर्मचारी वृंद व प्रशिक्षणार्थी यांचे ऊपस्थीतीत संपन्न झाले.


राज्याच्या मुख्य कार्यक्रम मुंबई येथील एलीफंटन टेक्नीकल हायस्कुल येथे भारताचे ऊप राष्ट्रपती मा. जगदीप धनखड यांचे शुभ हस्ते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले , कौशल्य विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मंगल प्रभात लोढा ‘ कौशल्य विकास सचिव गणेश पाटील यांचे प्रमुख ऊपस्थीतीत ऐकाच वेळी राज्यातील ‘४३४ आय टी आय संस्थेत ऑन लाईन (अभासि पद्धतीने ) संविधान मंदिराचे ऊद घाटन मान्यवरांच्या ऊपस्थीतीत संपन्न झाले नांदगावकर यांनी संविधानाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले तर पत्रकार मित्र फकीरा सोनवणे ‘ सेवा निवृत कर्मचारी अशोक लाटे यांनी संविधानाची गरज व महत्व पटवून दिले
कार्यक्रमाचे संयोजन निदेशक संजय पवार ‘ व प्रशिक्षणार्थी कु . अंजली धबडगडे’ कु . जाधव यांनी सुंदर गायनातुन डॉ .बाबासाहेब आंबडेकर यांनी भारतीय संविधान साठी केलेले परिश्रम व अभ्यास पूर्ण मांडणी बाबत माहती दिली विवीध स्पर्धा मध्ये यश संपादन करणा-या विजेतांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निदेशक वल्लमवाड ‘ किशारे जाधव संदेश झाडे भांडारपाल श्री रोकडे व सर्व कर्मचारी प्रशिक्षणार्थी यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button