दुःखापासून संसारापासून असंग कसं व्हायचं हे भागवत शिकवते- ह.भ.प.गजानन बाबा कळमनुरीकर
दुःखापासून संसारापासून असंग कसं व्हायचं हे भागवत शिकवते- ह.भ.प.गजानन बाबा कळमनुरीकर
****************
भोकर (तालुका प्रतिनिधी) कलियुगात अनाचार अत्याचार वाढले असले तरी श्रीमदभागवत कथेमध्ये सांगितलेले विचार संतांची संगती याचा जीवनात अवलंब केला तर दुःखापासून संसारापासून मुक्ती मिळू शकते त्यापासून असंग कसं व्हायचं हे भागवत शिकवते असे विचार ह.भ. प.गजानन बाबा कळमनुरी कर महाराज यांनी भोकर येथील भागवत कथेत बोलताना मांडले.
सार्वजनिक गणेश मंडळ भोकर यांच्या वतीने आयोजित श्रीमदभागवत कथेत बोलताना ह.भ. प.गजानन बाबा कळमनुरी कर म्हणाले जीवन जगावं कसं आणि मरावं कसं हे भागवत शिकवते,पूर्वीच्या काळी कथा कीर्तन अध्यात्मिक सोहळे कमी प्रमाणात होत असले तरी लोक मोठ्या प्रमाणात आचरण करीत होते,आज परमार्थ मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो,सप्ताह किर्तन सोहळे आयोजित केले जातात मोठी गर्दी उसळलेली दिसते,कथा ऐकण्यासाठी गर्दी करण्यापेक्षा कथा आचरणात आणणे गरजेचे आहे साधू संतांचे विचार कृती मधूनआचारामधून दिसले पाहिजे जीवाचा आधार करून घेण्यासाठी भागवत पुराण कथा ऐकावी,कलियुगात उधरून जाण्यासाठी भगवंताचे चिंतन हाच एक मार्ग आहे, संतांच्या विचारां पासून कुठेतरी दूर गेलो आहोत म्हणून संकटे येत आहेत,आजचा युवक शिकलेला असला तरी भरकटलेला आहे व्यसनाधीन झालेला आहे त्यामुळे अकाली मृत्यू अपघाती मृत्यू होत आहेत, आई-वडिलांची सेवा करा, ईश्वर चिंतन करा,आपली नीतिमता चांगली ठेवा, गोरगरिबाला मदत करा,जीवनभर कितीही पैसा कमावला,बंगले बांधले तरीही सोबत काहीच येत नाही,रिकाम्या हातानं जावं लागतं म्हणून भगवंताशि नाते जोडा,ईश्वराची केलेली भक्ती हेच तुम्हाला तारुण नेणार आहे, ईश्वराला फक्त भाव लागतो तुम्ही शुद्ध भावनेने हाक मारा तो नक्कीच तुमच्यासाठी धावून येईल असे सांगून भागवत कथेतील विविध प्रसंग आपल्या रसाळ वाणीतून सांगितले श्रोते मंडळी तल्लीन होऊन गेले होते