मुखमंत्री माझी शाळा सुंदर शाळेच्या दुसऱ्या टप्यात जि.प.प्रा.शा. होकार्णा शाळा प्रथम..
मुखमंत्री माझी शाळा सुंदर शाळेच्या दुसऱ्या टप्यात जि.प.प्रा.शा. होकार्णा शाळा प्रथम..
जळकोट प्रतिनिधी दिनांक १२.०९.२०२४ रोजी जि.प. प्रा.शा होकर्णा शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र. २ च्या अनुषंगाने शाळेने पूर्ण केलेल्या निकषा चे मुंल्यांकन पूर्ण झाल्या मुळे आज जिल्हा परिषद लातूर ची पुनरमूल्यांकन समितीने शाळेला भेट देऊन पूर्ण केलेल्या निकशांचे पुनर तपासणी तिन्ही भागाचे १५० गुणांचे घटक निहाय मूल्यांकन करून मूल्यांकनांच्या अंती जळकोट तालुक्यात प्रथम आल्याचे घोषित केले तसेच ही शाळा जिल्हा पातळीच्या स्पर्धेत आल्याचे स्पष्ट केले.
सदरील समितीमध्ये श्री प्रमोद पवार उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद लातूर, तसेच श्री संतोष ठाकूर साहेब अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था मुरुड, श्री संजीव पारसेवार सर शिक्षण विस्तार अधिकारी जि प लातूर विकास चव्हाण सर जिल्हा परिषद लातूर अशोकराव जाधव सर जिल्हा परिषद लातूर, हे उपस्थित होते एकंदरीत सर्व बाबीवर शाळेकडून लक्ष देण्यात आले असल्यामुळे समितीकडून समाधान व्यक्त करण्यात आले व शाळेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शाळेकडून मूल्याणकण समितीचे शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी गावचे प्रथम नागरिक श्री दामोदर जी बोडके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शिव शंकर जी डोनगावे, केंद्रप्रमुख श्री माधव जी हंगरगे, श्री अर्जुन जाधव गट साधन केंद्र जळकोट, श्री केंद्रे डी. एस गट साधन केंद्र जळकोट मुख्याध्यापक विजयकुमार तेलंग सर, गुरुनाथ हवा, विजय गोरे, बाबुराव धूळशेट्टे, संजय शिवनगे, नवनाथ जाधव, नागेश गोविंदवाड व ग्रामस्थ व सर्व विध्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन नागेश गोविंदवाड सरांनी केले व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक विजयकुमार तेलंग सरांनी केले.