भोकर येथील विश्वकर्मा मंदिर परिसरातील जागेचा विकास करण्यासाठी कटिबद्ध- खा.अशोकराव चव्हाण
भोकर येथील विश्वकर्मा मंदिर परिसरातील जागेचा विकास करण्यासाठी कटिबद्ध- खा.अशोकराव चव्हाण
****************
भोकर (तालुका प्रतिनिधी) येथील विश्वकर्मा मंदिर संस्थानची जागा मोठ्या प्रमाणावर असून त्या ठिकाणी नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करून तेथील जागेचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे आश्वासन माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी भोकर येथे विश्वकर्मा मंदिरात आयोजित विश्वकर्मा समाज बांधवांच्या बैठकीत बोलताना दिले.
भोकर येथे 12 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा मंदिरात समाज बांधवांचे बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रथम खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते विश्वकर्मा प्रभूंची पूजा आरती करण्यात आली उपस्थित सर्व मान्यवरांचे मंदिर समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले प्रास्ताविक मंदिर समितीचे सचिव बी.आर.पांचाळ यांनी केले मंदिराच्या जागेत भव्य सभा मंडप,परिसराला संरक्षण भिंत,सर्व बाजूंनी नाल्या करून विकास करावा असे मनोगत व्यक्त केले. यावेळी पुढे बोलताना खा.अशोकराव चव्हाण म्हणाले भोकर तालुक्याच्या विकासाला मागील 15 वर्षापासून आपण कुठेच कमी पडलो नाही,यापुढेही तालुक्याचा विकास मोठ्या गतीने होईल भोकर येथील विश्वकर्मा मंदिराची जागा भव्य असून त्या ठिकाणी नियोजनबद्ध आराखडा तयार करून परिसराचा चांगला विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे सांगून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दूरदृष्टी ठेवून सर्वांसाठी विविध विकासात्मक योजना आणल्या आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावे भोकर मतदार संघातून श्रीजया चव्हाण ह्या इच्छुक असून त्यांनाही सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन खा.चव्हाण यांनी केले, एड.परमेश्वर पांचाळ यांनीही यावेळी विचार मांडले. या कार्यक्रमास माजी आमदार अमरनाथ राजुरकर, प्रकाश देशमुख भोशीकर,समन्वयक भगवानराव दंडवे,भाजपा ता.अध्यक्ष गणेश पा.कापसे,किशोर पाटील, विनोद पाटील चिंचाळकर, रामचंद्र मुसळे,दिलीपराव सोमठाणकर, विशाल माने, सुनील शाह,मिर्झा ताहेर बेग यांच्यासह महंत परमेश्वर महाराज,मंदिर समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पांचाळ, डॉ.किरण पांचाळ,सुनील पांचाळ,मनोज सचिन पांचाळ,भगवान पांचाळ,बालाजी नारलेवाड,राजू पांचाळ,गोविंद सोमठाणकर,महेश पांचाळ यांच्यासह मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते