Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशेती विषयी
रेनापुर येथील दोन युवक पुराच्या पाण्यात गेले वाहून
रेनापुर येथील दोन युवक पुराच्या पाण्यात गेले वाहून
****************
भोकर( तालुका प्रतिनिधी) तालुक्यात गेली 3 दिवसापासून मुसळधार पाऊस अतिवृष्टी चालू आहे अनेक नदी नाल्यांना पूर आला असून 3सप्टेंबर रोजी रेनापुर येथील दोघे युवक शेताकडे जात असताना नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेले आहेत.
भोकर तालुक्यातील रेणापूर येथील युवक श्रीनिवास भरत मुळेकर(,20)व यश संदीप भगत( 19)हे 3 सप्टेंबर रोजी शेताकडे जात असताना नदी ओलांडताना नदीला आलेल्या पुरामध्ये पाय घसरून पडल्याने दोघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत घटनेचे वृत्त समजतात तहसीलदार सुरेश घोळवे यांनी बचाव कार्य हाती घेतले असून सदर दोन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी गावातील मंडळी व शासनाच्या वतीने शोध घेण्याचे काम चालू आहे