बहिर्जी महाविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे यश…..
बहिर्जी महाविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे यश…..
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
तेजबीरसिंग जहागीरदार याने धनुर्विद्या स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक…..
वसमत… प्रतिनिधी….
वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयाने यशाची आंतरराष्ट्रीय भरारी घेतली असुन महाविद्यालयाचा विद्यार्थी तेजबीरसिंग जहागीरदार याने चीन मधील तैपेई शहरात दिनांक २९ आँगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान संपन्न झालेल्या दुसऱ्या एशियन युनिव्हर्सिटी आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने आपला प्रतिस्पर्धी ह्युआन चॅंन ली याचा १३५ विरुद्ध १४५ गुणांनी पराभव करून हे सुवर्णपदक पटकावले आहे. तेजबीरसिंग जहागीरदार हा महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. यापूर्वी त्याने विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला असुन प्रत्येक ठिकाणी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर हा बहुमान मिळविणारा तो बहिर्जी महाविद्यालयाचा व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पहिला विद्यार्थी ठरला आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बहिर्जी स्मारक महाविद्यालया तर्फे विद्यार्थ्यांना सर्वांगीण प्रगतीसाठी शैक्षणिक, संशोधन, सांस्कृतिक, क्रीडा व इतर सर्व प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. तसेच त्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन तज्ञ प्राध्यापकां तर्फे केले जाते. यामुळे महाविद्यालयाचे विद्यार्थी आज समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहेत अशी माहिती प्रभारी प्राचार्य डॉ मा. मा. जाधव यांनी दिली.
नुकताच महाविद्यालयाला बेंगलोर येथील नॅक कडुन “अ”दर्जा प्राप्त झाला आहे. “अ”दर्जा मिळवणारे हिंगोली जिल्ह्य़ातील एकमेव महाविद्यालय असुन स्वा.रा.ती.म विद्यापीठ क्षेत्रात एक नावाजलेली शैक्षणिक संस्था म्हणून कार्यरत आहे. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकाला संशोधन क्षेत्रात गॅस सेन्सर साठी आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले असुन भविष्यातही गुणवत्तेची ही घौडदौड सुरू राहील असा आशावाद व्यक्त केला.महाविद्यालयाच्या विविध क्षेत्रातील अतुलनीय यशाच्या मागे संस्थेचे अध्यक्ष मा.जयप्रकाश दांडेगावकर ,सचिव मा.पंडितराव देशमुख, उपाध्यक्ष मा.मुंजाजीराव जाधव व संस्थेच्या पदाधिकार्यांचे मार्गदर्शन व पाठबळ असल्याचे प्रतिपादन प्राचार्यांनी यावेळी केले.
तेजबीरसिंग जहागीरदार याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, उपाध्यक्ष श्री मुंजाजीराव जाधव साहेब, सचिव श्री पंडितराव देशमुख सर, कोषाध्यक्ष श्री उमाकांतराव शिंदे, अँड. श्री रामचंद्रजी बागल साहेब ,मा.नितीन महागावकर यांच्या सह संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, क्रिडा संचालक प्रा निरंजन अकमार यांनी अभिनंदन केले असुन शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच महाविद्यालयातर्फे सदरील विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याचे प्राचार्यांनी कळवले आहे.