आपल्यला लोन पाहिजे का ?
आपला महाराष्ट्रधार्मिक वार्तासामाजिक कार्य

धर्मा पासुन,संत विचारा पासुन दुर चाललो आहोत म्हणून देशात संकटे वाढली- महंत प्रभाकर बाबा कपाटे

धर्मा पासुन,संत विचारा पासुन दुर चाललो आहोत म्हणून देशात संकटे वाढली- महंत प्रभाकर बाबा कपाटे
****************

भोकर (तालुका प्रतिनिधी )

श्रीकृष्ण चरीत्र व राम चरीत्र जीवनात ऊतरवीणे गरजेचे आहे आज आपण धर्मा पासुन, संत वीचारा पासुन दुर चाललो आहोत म्हणून देशात संकटे वाढली आहेत असे वीचार महंत प्रभाकर बाबा कपाटे यांनी भोकर येथे श्रीकृष्ण जन्म सोहळ्यात बोलताना मांडले
श्रीकृष्ण ज्ञान मंदिर ट्रस्ट भोकर यांच्या वतीने कृष्ण जन्माष्टमी सोहळा 26 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला सकाळी अभिषेक पूजा करण्यात आली,गीता पारायण व संगीत भजनचा कार्यक्रम झाला रात्री 11 वा. महंत प्रभाकर बाबा कपाटे यांचे श्रीकृष्ण जन्म यावर प्रवचन झाले यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले श्रीकृष्ण प्रभूंचे जीवन अलौकीक आहे देव स्वतःच्या इच्छेनुसार जन्म घेतात अत्यंत संकट कालीन परिस्थितीत ईश्वरांनी जन्म घेतला,आपले अवतार कार्य साधले ,दुष्ट लोकांचा संहार केला,विश्वाला सुखी करण्यासाठी अनेक लीला केल्या,खरा धर्म मानव हाच आहे धर्म आचरणात आणावा लागतो,केवळ कपडे घालून संन्याशी होता येत नाही तर कार्य करावे लागते, श्रीकृष्णाने सर्व जाती धर्माच्या लोकांना गरीब श्रीमंतांना एकत्रित करून काला केला हा मोठा संदेश आहे,सांदीपनी ऋषीच्या आश्रमात त्यांनी झाडलोट केली,आपण आज मात्र पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत आहोत आणि बाहेर देशांमध्ये आपल्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला जातो,देशात अराजकता माजली आहे ,महिलांवर अत्याचार वाढत आहेत म्हणून आजच्या मुलांना संस्कारीत बनवणे गरजेचे आहे,जे हात मंदिरात जोडले जातात ते बाहेर काय करतात हे पाहणं खरं महत्त्वाचं आहे,कृष्ण चरित्र जीवनात आणल्याशिवाय मानवी जीवन धन्य होणार नाही,चांगले कर्म करणं म्हणजेच कृष्णाची पूजा आहे असेही शेवटी महंत कपाटे महाराज म्हणाले रात्री ळ12 वाजता फुले गुलाल अक्षता उधळून जयघोष करीत श्रीकृष्ण जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महिला पुरुष मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button