भोकर मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जन आक्रोश आंदोलन
भोकर मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जन आक्रोश आंदोलन
***********
भोकर तालुका प्रतिनिधी : बदलापूर अकोला व महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी महिलेवर व बालिकेवर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ भोकर मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने 24 ऑगस्ट रोजी जन आक्रोश मोर्चा काढून तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले.
भोकर मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध मोर्चा काढण्यात आला बदलापूर अकोला व कोलकत्ता येथील महिला डॉक्टर वरील अत्याचार करणाऱ्या नराधमावर जलद गती न्यायालयाने खटला चालवून फाशी द्यावी महाराष्ट्र सरकारचा गुन्हेगारावर वचक राहिला नाही राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे मुख्यमंत्री व गृहमंत्री निष्क्रिय ठरले असून त्यांनी नैतिकता स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंद बाबा गौड, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पा. किन्हाळकर ,शहराध्यक्ष तौशीफ इनामदार, भीमराव दुधारे निळकंठ वर्षेवार, सुरेखा माळे, एम. ए. रजाक सेट, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश देशमुख, तालुकाध्यक्ष संतोष आलेवाड एड. परमेश्वर पांचाळ, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष ऍड. शिवाजी कदम, दत्तात्रय पांचाळ यशोदाताई शेळके, आदींच्या स्वाक्षऱ्या असून आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते