भोकर विधानसभा मतदारसंघातून तृतीयपंथी पायल मीराशे निवडणूक लढविण्यास इच्छुक
भोकर विधानसभा मतदारसंघातून तृतीयपंथी पायल मीराशे निवडणूक लढविण्यास इच्छुक
***************
भोकर (तालुका प्रतिनिधी)
भोकर विधानसभा मतदारसंघाची येणारी निवडणूक आपण लढविण्यास इच्छुक असल्याचे मत तृतीयपंथी कु. पायल विठ्ठल मिरासे हिने पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
भोकर विधानसभा मतदारसंघात विधानसभा 2024 निवडणुकीचे वारे वाहू लागले असून अनेक दिग्गज मातत्बर मंडळीने कंबर कसलेली असतानाच तृतीय पंथी कु. पायल विठ्ठल मिराशे हिनेदेखील निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली भोकर येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत तिने पत्रकारांशी संवाद साधला आम्हाला सुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने अधिकार दिलेले आहेत आम्ही सुद्धा शिक्षण घेऊ शकतो, विचार मांडू शकतो पण समाज वेगळ्या दृष्टीने आमच्याकडे पाहत असल्यामुळे कोणी पुढे येण्याची हिंमत करीत नाही मी मात्र निर्धार करून भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे सर्वसामान्य माणसांच्या समस्या आम्हाला माहित आहेत कोणाच्या विरोधात निवडणुका लढवायचे नाही मात्र आपल्या अस्मितेसाठी आपण ही निवडणूक लढविणार असल्याचे पायल ने निर्भीडपणे सांगितले