भोकर मध्ये सकल हिंदू संघटनांनी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद; शहरातील दुकाने कडकडीत बंद
भोकर मध्ये सकल हिंदू संघटनांनी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद; शहरातील दुकाने कडकडीत बंद
**************
भोकर (तालुका प्रतिनिधी): बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात सकल हिंदू संघटनांनी पुकारलेल्या भोकर बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला 20 ऑगस्ट रोजी शहरातील सर्व दुकाने प्रतिष्ठाने बाजार हॉटेल बंद होती.
बांगलादेश मध्ये अराजकता माजली असून तेथील हिंदू धर्मियांवर हल्ले करण्यात येत आहेत हिंदू देवतांचे मंदिरे उध्वस्त करणे मुर्त्यांची विटंबना करणे अशा घटना घडत आहेत या घटनेच्या निषेधार्थ 20 ऑगस्ट रोजी भोकर बंदचे आवाहन सकल हिंदू संघटनांनी केले होते त्यानुसार शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठ, व्यापार, भाजीपाला, अडत दुकाने सर्व काही बंद होते,बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला,शहरात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी ठीक ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
पंजाब हुलगुंडे, आनंद डांगे, नारायण सादुलवार, संजय सोनाळे, आकाश गेंटेवार, राहुल कोंडलवार, विष्णू पांचाळ, प्रकाश मुदीराज पवन चक्रवार, राजीव कानडे यांच्यासह सकल हिंदू संघटनांनी बंदचे आवाहन केले होते