शारदा महिला मंडळातर्फे नेताजी शाळेत वृक्षारोपण
शारदा महिला मंडळातर्फे नेताजी शाळेत वृक्षारोपण
मानवत सौ ममता चिद्रवार
मानवत येथील शारदा महिला मंडळातर्फे नेताजी सुभाषचंद्र विद्यालय येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम उस्फूर्तपणे करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यालयातील मुख्याध्यापक श्री हारकाळ सर, श्री.सदाशिवजी होगे, श्री. विश्वनाथजी बुधवंत सर , सौ पतंगे मॅडम, सौ.कनकुटे मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षिका वृंद यांनी या उपक्रमाचे खूप स्वागत केले . या वृक्षारोपणासाठी अनेक वर्षांपासून हजारो मोफत रोपे वाटप करणाऱ्या “शिवराज सेवाभावी संस्थे”चे श्री. आप्पा चिंचोलकर यांनी उपलब्ध करून दिली त्यांचे हे वृक्ष दान अनमोल आहे . या कार्यक्रमात शारदा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.मिनाताई देशमुख उपाध्यक्षा सौ.सुवर्णमाला कुळकर्णी, कोषाध्यक्षा सौ.संगीता रुद्रवार, सौ.शोभा कुलकर्णी, सौ. राणी पारसकर, डॉ सौ.शरयू खेकाळे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी या सर्वांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. यावेळी पर्यावरण पूरक करंज, वड, बदाम, कडुलिंब अशी एकूण दहा रोपे लोखंडी जाळीसह लावण्यात आली.