Homeआपला महाराष्ट्रशालेय शिक्षण व क्रीडासरकारी योजना
मा. विजयकुमार दलाल यांच्या हस्ते विद्यालयात ध्वजारोहण
मा. विजयकुमार दलाल यांच्या हस्ते विद्यालयात ध्वजारोहण
———————–
मानवत : येथील सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये 78 व्या.भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक श्री.विजयकुमार दलाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याबरोबरच ध्वजारोहणानंतर ना विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम,भाषणे ,भितीपत्रक विमोचन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी ,विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,प्रतिष्ठित नागरिक,सन्माननीय पालक,विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.