आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रधार्मिक वार्ता

नगरेश्वर मंदिर येथे आर्य वैश्य समाज बाधव च्या वतीने पातेवार व नांदेडकर यांचा सत्कार

नगरेश्वर मंदिर येथे आर्य वैश्य समाज बाधव च्या वतीने पातेवार व नांदेडकर यांचा सत्कार

लोहा : आज नगरेश्वर मंदिर येथे आर्य वैश्य समाज लोहा च्या वतीने नांदेड येथे दिनांक 23 ऑगस्ट 2024 ते 29 ऑगस्ट 2024 या कालावधीत शिवपुराण कथाकार शिवश्री पंडित प्रदीपजी मिश्रा यांची शिवपुराण कथा होणार आहे. नांदेड मध्ये अनेक दाते असताना सुद्धा हा मान लोहा शहरातील प्रसिध्द उद्योजक प्रशांत सेठ पातेवार व डॉ. शिवराज नांदेडकर यांना मिळाला.म्हणून आपल्या माणसांचा गौरव करणं,सत्कार करणं आपलं कर्तव्य लागते.म्हणून यांचा यथोचित मान सन्मान समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास उपस्थित आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष श्री दिनेश तेललवार, तुकाराम सावकार कोटलवार, किरण सेठ वट्टमवार, संजय पाटील कऱ्हाळे,श्री दत्ता वाले,नामदेव कटकमवार सुरेश कोटगिरे , संजय चालीकवार, बालाजी अंकुलवार नागेश दमकोडवार , बालाजी रहाटकर,विजय तेललवार दिलीप कवटिकवार,गजानन कोटगिरे,बालाजी कापरतवार, श्याम रहाटकर, बडू कटकमवार,
संजय रहाटकर,प्रसाद रुद्रवार, मनोज महाजन,अशोक पेडगुलवार प्रदीप निलावार धंनजय कोटलवार,सचिन मोटरवार, उत्तरवार, व्यंकट येमवार,व असंख्य समाज बांधव उपस्थित होते. त्यांच्या हातून होत असलेल्या या शुभ कार्यास सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button