मानवतला नगरेश्वर मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
मानवतला नगरेश्वर मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
मानवत सौ ममता चिद्रवार
मानवत येथील नगरेश्वर मंदिराचा वर्धापनदिन आर्य वैश्य समाज व आर्य वैश्य महिला मंडळाच्या वतीने रविवारी ता ११ धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला .
शहरातील संभाजीनगर भागात असलेल्या भगवान नगरेश्वर मंदिराचा वर्धापनदिन श्रावण शुद्ध सप्तमीला असल्याने रविवारी ता ११ सकाळी १० वाजता वेंकटेश चिद्रवार , व सौ रेणुका चिद्रवार यांच्या वतीने नगरेश्वर भगवान , वासवी माता कन्यका परमेश्वरी व ब्रम्हीभूत संत वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात आला . आर्य वैश्य महिला मंडळाच्या वतीने शिव शिवमहिमन्न पाठ घेण्यात आला . महाआरती नंतर महाप्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्य वैश्य समाजाचे बालकिशन वट्टमवार , अनिल पदमवार , बालाजी चिद्रवार , वेंकटेश पालदेवार , किरण गुंडाळे , विवेक देवशेटवार , प्रा डॉ अशोक चिंदूरवार , प्रा पंकज चालीकवार , निलेश गडम , अनिल ढमढेरे , किशोर कोकडवार , अक्षय कोकडवार , डॉ सचिन चिद्रवार , गजानन बंडेवार , सुनील चिद्रवार आदींनी प्रयत्न केले .