४२ गाव पाणी संघर्ष समितीचे रास्तारोको आंदोलन मागे
४२ गाव पाणी संघर्ष समितीचे रास्तारोको आंदोलन मागे
पाटबंधारे विकास महामंडळाने उचित कार्यवाही करण्याचे दिले पत्र
मानवत तालुका प्रतिनिधी
पाणी उपलब्धतेबाबत प्राथमिक अहवाल महामंडळास तात्काळ सादर करून उचित कारवाई करण्याबाबतचे पत्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिल्यानंतर
मानवत तालुक्यातील २२ व परभणी तालुक्यातील २० अशा एकूण ४२ गावातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था करावी या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी ता ८ तालुक्यातील ताडबोरगाव पाटीवर करण्यात येणारे रास्तारोको आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे .
याबाबत माहिती अशी की , सदरील ४२ गावे जायकवाडी व लोअर दुधना प्रकल्पातुन होणा-या सिंचना पासून वंचीत आहेत . मुळात जमीनी मध्यम व हलक्या व काही वर्षात पाऊस अवेळी पडत असल्याने या ४२ गावातील शेतकरी व शेतमजुर संकटात सापडले आहे त्यामुळे ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मानवत तालुक्यातील ताडबोरगाव पाटीवर ४२ गाव पाणी संघर्ष समीतीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार होता .
परंतु या आंदोलनापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे उपअधीक्षक अभियंता नं ना भामरे यांनी सदरील आदेश दिले आहे . यामुळे गुरुवारी ता ८ होणारे रास्तारोको आंदोलन ४२ गाव पाणी संघर्ष समितीच्या वतीने मागे घेण्यात आले .
गुरुवारी ता ८ शहरातील माँसाहेब जिजाऊ सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली . या बैठकीत बीड येथील कार्यकारी अभियंता एल जी लांब यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत आंदोलनकर्त्यांना पत्र दिले .
यावेळी समितीचे रंगनाथ सोळंके , शिवाजी बोचर , माणिक काळे, मदन शिंदे, लक्ष्मण सुरवसे, विकास काकडे, आकाश लोहट, विश्वनाथ सुरवसे , उद्धव काळे, अर्जुन काळे, कृष्णा शिंदे, हनुमान मसलकर, हनुमान मस्के, सूरज काकडे, हरिभाऊ निर्मळ, सुभाष जाधव यांचेसह आंदोलनकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते .