आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रक्राईम वार्ताग्रामीण वार्ता

पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीस ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीस ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

उदगीर–पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीस ५वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड असा निकाल उदगीरचे तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. बी. गमे यांनी बुधवारी दिला.
याबाबत ची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी पिडीत महिला सोनाबाई सोमनाथ वाघमारे हिचे लग्न आरोपी पती सोमनाथ वाघमारे सोबत झाले होते. परंतू घटनेपुर्वी दिड महिन्यापासून आरोपी हा तिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला रोज दारु पिवून शारिरीक व मानसिक त्रास देत असे. दिनांक ०८.१२.२०१८ रोजी परत आरोपीने दारु पिवून फिर्यादीस शिवीगाळ केली त्या गोष्टीचा राग मनात धरुन व आरोपीने दिलेल्या त्रासाला कंटाळून फिर्यादी महिलेने स्वतःला रॉकेल ओतून पेटवून घेतले व तिच्या मृत्यूपुर्व जबाबाच्या आधारे उदगीर ग्रा. पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २८/२०११ कलम ४९८, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला व फिर्यादीच्या मृत्यू नंतर कलम ३०६ भादवि वाढविण्यात आले व त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांच्याकडे देण्यात आला व आरोपींविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
उदगीर येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होवून व सरकार पक्षाच्या वतीने एकुण १० साक्षिदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या साक्षिदारांच्या साक्षिपुराव्यांवर व कागदपत्रावरती तसेच फिर्यादीचा मृत्यूपुर्व जबाब व सहा. सरकारी वकील शिवकुमार गिरवलकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.बी. गमे यांनी आरोपीस कलम ३०६ भादवि अन्वये ०५ वर्षे सश्रम कारावास व १हजार रु. दंड तसेच दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
सदरील प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील म्हणून अॅड. शिवकुमार गिरवलकर यांनी काम पाहिले त्यांना पैरवी अधिकारी अक्रम शेख यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button