भोकर येथे संत नामदेव महाराज संजीवन सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा
भोकर येथे संत नामदेव महाराज संजीवन सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा
***********
भोकर तालुका प्रतिनिधी : वारकरी संप्रदायातील महान संत लेखक कीर्तनकार संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा674 वा संजीवन समाधी सोहळा 2 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला.
येथील ग्रामीण रुग्णालयासमोर असलेल्या श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या मंदिरात बाबुराव महाराज तेरकर उमरखेड यांचे कीर्तन झाले दुपारी सामूहिक आरती करण्यात आली यावेळी परमपूज्य शांतिनाथ महाराज रत्नागिरी विश्व माऊली परिवार, ह.भ. प.महंत मुक्ताई नाथ माऊली संस्थान टाकराळा, पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मार्कड, स पो नी आवटे, सभापती जगदीश पाटील भोसीकर, विनोद पाटील चिंचाळकर यांच्यासह मंदिर समितीचे श्रीकांत दरबस्तवार ,गणेश मगीरवार, जनार्धन पोटपेलवार, गणेश श्रीराम वार, अनिल मगीरवार राजू श्रीरामवार, संगेवार, पद्माकर को टूरवार, प्रमोद कोटूरवार एकनाथ पोट पलेवार यांच्यासह सर्व शिंपी समाज बांधव उपस्थित होते, तुकाराम संभाजी पोटपल्लेवार यांच्या अनुष्ठानाला बारा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांची साखर तुला करण्यात आली