Homeआपला महाराष्ट्रशालेय शिक्षण व क्रीडासरकारी योजना
नांदेड येथील किक बॉक्सिंग टीमची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड
नांदेड येथील किक बॉक्सिंग टीमची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड
नादेड,(प्रतिनिधी) नुकत्याच गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ऋतिक श्रीनिवास बंडेवार यांनी सुवर्ण पदक पटकावले असून कलकत्ता दिगा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ट्रेनिंग कैंम्प करिता त्याची निवड झाली आहे.
सदरील खेळाडू दिपा गवळे, ऋतिक बंडेवार , प्रर्तिक बाफना,कार्तिक राठौड़ ,मुमेज शेख यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील निवडीबद्दल मुख्य प्रशिक्षक किरण गवळे (आंतरराष्ट्रीय पदक विजेते) व दिपा गवळे (NIC कोच), किक बौक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार, सचिव धीरज वाघमारे तसेच नांदेड जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.