काँग्रेस पक्षाकडून संधी मिळाल्यास भोकर विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक- माजी जि.प.सभापती बाळासाहेब पा.रावणगावकर
काँग्रेस पक्षाकडून संधी मिळाल्यास भोकर विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक– माजी जि.प.सभापती बाळासाहेब पा.रावणगावकर
**************
भोकर (तालुका प्रतिनिधी) नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा नां.जी.म.बँकेचे विद्यमान संचालक बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी काँग्रेस पक्षाकडून संधी मिळाल्यास भोकर विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे मत व्यक्त केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी पूर्वी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्याने भोकर मतदार संघाचे काय होणार हा राजकीय विषय चर्चिल्या जात असतानाच काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी व पक्ष मजबूत करून टिकवून ठेवण्यासाठी बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी काँग्रेस पक्षामध्येच राहून पक्षाचे निष्ठेने काम केले लोकसभा निवडणुकीत आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन काँग्रेसची निष्ठावंत मंडळी जोडून शक्ती मजबूत केली आणि लोकसभा निवडणुकीत खासदार वसंतराव चव्हाण यांचा बहुमताने विजय झाला लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे जोमात वाहू लागलेआहे इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे,अशातच घराण्याला राजकीय वारसा असलेले ग्रामपंचायत पासून विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कामाचा अनुभव असलेले नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नां.जि.म.बँकेचे संचालक बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी देखील भोकर विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास आपण लढविणार असल्याची इच्छा व्यक्त केली तशी मागणीही त्यांनी पक्षाकडे केलीआहे,भोकर तालुक्यातील राजकारणात कै.किशनराव पाटील रावणगावकर यांचे नाव आदराने घेतले जाते त्यांचाच वारसा जपत रावणगाव ग्रामपंचायत पासून बाळासाहेब पाटील रावनगावकर यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली,ग्रामीण भागातील अडीअडचणी काय आहेत याचा अभ्यास त्यांना झाला आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि कृषी सभापती पदाची संधी त्यांना मिळाली त्या काळात त्यांनी अनेक विकास कामे केली, भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकही ते झाले,नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दोन वेळा संचालक झाले, ज्या पक्षाने आपणास मोठे केले त्या पक्षाला न विसरता अडचणीच्या काळात पक्षाला बळकटी देऊन सर्वसामान्य माणूस जोडून काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.राजकीय क्षेत्राचा,विकास कामांचा,जनतेच्या संपर्काचा,ग्रामीण भागातील समस्यांचा अनुभव असलेले रावणगावकर यांनी सर्वसामान्य माणसाचा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण केली.स्पष्ट वक्तेपणा, सृजनशीलता, धडाडीचे नेतृत्व, दांडगा जनसंपर्क अशा विविध गुणांनी संपन्न असलेले बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास आपण विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे मत व्यक्त केले आणि पक्षाने ज्या नेतृत्वाला संधी दिली त्यासाठी आपण मनोभावे निष्ठेने काम करणार असल्याचेही ते म्हणाले