चाळीस वर्षापासुन रखडलेल्या चिखलभोसी पानभोसी रोड सह परीसरातील विकास कामासाठी निधी द्यावा;सौ.राजश्रीताई भोसीकर यांनी केली बैठकीत मागणी
चाळीस वर्षापासुन रखडलेल्या चिखलभोसी पानभोसी रोड सह परीसरातील विकास कामासाठी निधी द्यावा; जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ.राजश्रीताई भोसीकर यांनी केली बैठकीत मागणी
लोहा,(प्रतिनिधी) नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मा.ना.गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी जिल्हातील खासदार,आमदार व जिल्हानियोजन समितीच्या सदस्यासह बैठकीत विकास कामाबाबत आपली भुमिका सादर केली. यावेळी जिल्हानियोजन समितीच्या सदस्या सौ.राजश्रीताई मनोहर भोसीकर यांनी चिखलभोसी ते पानभोसी रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले.
तसेच पांगरा पानभोसी रस्ताचे डांबरीकरण झाले आहे सदरिल रस्ता हा पांगरा पानभोसी रोडला जोडल्यास त्या भागातील जनतेला तालुक्याच्या ठिकाणी जायला वेळ लागनार नाही. तसेच पानभोसी हे पाच हजार वस्तीचे गाव असून आद्याप गावात स्मशानभुमी नाही त्यासाठी आवश्यक तरतुद करण्याचीही मागणी सौ. भोसीकर यांनी केली.
तसेच आनंदवाडी, गंगनबिड, नवरंपुरा, दिग्रस व ईतर ठिकानी रस्तासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यांसह विविध मागण्या पालकमंत्री मा.ना.गिरीश महाजन यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ राजश्रीताई मनोहर भोसीकर यांनी केली आहे.