इंजि.विश्वंभर पवार यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक विविध विकास प्रश्नांनी गाजवली
इंजि.विश्वंभर पवार यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक विविध विकास प्रश्नांनी गाजवली
****************
ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे मांडले प्रश्न
****************
भोकर( बी.आर.पांचाळ) जिल्ह्याच्या विकासासंदर्भात महत्वपूर्ण कामांसाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक 27 जुलै रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन व विकास समितीचे सदस्य इंजि.विश्वंभर पवार यांनी ग्रामीण भागातील विविध प्रश्न रोखठोकपणे मांडून वास्तव उभे केले, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विचारून बैठक गाजवली.
पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण,खा.अजित गोखछडे, खा.नागेश पा.अष्टीकर, खा.शिवाजी काळगे, खा.वसंत चव्हाण, आ.बालाजी कल्याणकर, आ.मोहन हंबर्डे, आ.राजेश पवार, आ.शामसुंदर शिंदे,आ.विक्रम काळे,आ.भीमराव केराम,आ.जितेश अंतापुरकर,आ.माधवराव पा.जवळगावकर,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आदींची उपस्थिती होती मागील वर्षाच्या निधीतून 659 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले.ग्रामीण भागात शाळांमध्ये स्वच्छता ग्रह नाहीत,स्मशानभूमीची अवस्था अतिशय वाईट असल्याचे सदस्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी धारेवर धरले,वर्ष 2024- 2025 साठी 749 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून 231 कोटी निधी वितरित करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आमदारांनी निधी वाढून देण्याबाबत सूचना केली.
इंजि.विश्वंभर पवार यांनी विविध प्रश्नांनी बैठक गाजवली
***************
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन व विकास समितीचे सदस्य इंजि.विश्वंभर पवार यांनी विविध प्रश्नानी बैठक गाजवून टाकली. शेतकऱ्यांच्या खात्यावर विनाअट पीक विम्याची रक्कम जमा करा, जिल्ह्यात नवीन बसेस द्या,मनरेगातून रोजगार उपलब्ध करा, रेल्वे गाड्यांची संख्या वाढवा,पुनर्वशीत गावांचे प्रश्न मिटवा, खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी करून भोकर सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे यांच्याकडे नांदेड अधीक्षक कार्यालयाचा अतिरिक्त पदभार असल्याने येथील कारभार विस्कळीत झाला आहे रस्त्याची कामे अर्धवट असल्याने अपघात वाढले आहेत, भोकर ग्रामीण रुग्णालयात काही डॉक्टर हजर राहत नाहीत,ॲम्बुलन्स असले तर चालक नाहीत रुग्णांची हेळसांड होत आहे, भोकर येथील एम आय डी सी मध्ये रस्त्याचे काम सुरू झाले असून तेथे उद्योगासाठी जागा उपलब्ध करून द्यावी,भोकरला पॉलिटेक्निक कॉलेज उभारण्यात यावे ,बाभळी बंधाऱ्याच्या शेतकऱ्यांचे अनुदान देण्यात यावे अशा विविध प्रश्नांचा भडीमार करून सभागृहाचे लक्ष वेधले अनेक अधिकारी मात्र या प्रश्नांच्या भडीमाराने निरुत्तर झाले होते.