आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशेती विषयी

भोकर तालुक्यात संततधार पावसाने पीके बहरली; नदी नाले तलाव मात्र अद्यापही कोरडेच

भोकर तालुक्यात संततधार पावसाने पीके बहरली; नदी नाले तलाव मात्र अद्यापही कोरडेच
****************

( भोकर तालुका बी.आर.पांचाळ ) -चालू वर्षाच्या खरीप हंगामात पिकांना पुरेल एवढाच पाऊस झाला असून जुलै महिना संपत आला तरीही नदी,नाले,तलाव,विहिरीमध्ये पाणी साठलेले नाही जुलै महिन्यामध्ये संततधार पाऊस सुरू झाल्याने खरिपांची पिके बहरली आहेत, नद्यांना पूर आलेच नाहीत तालुक्यातील मोठ्या तलावामध्ये देखील अत्यल्प पाणीसाठा आहे.
चालू वर्षी मृग नक्षत्रात पावसाने साधारणपणे सुरुवात केली असली तरी अर्द्रानक्षत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पेरण्यांना प्रारंभ झाला,काही दिवस पावसाने उघडीप दिली होती मात्र पुन्हा पाऊस झाल्याने जुलै महिन्यात पिके भरली 14 जुलैपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू झाला सोयाबीन,कापूस,ज्वारी,पुढील मूग अशी पिके चांगल्या प्रकारे बहरलेली दिसत आहेत,पिकांना पाऊस योग्य प्रमाणात असल्यामुळे पिकांची वाढ जोमाने झाली आहे पेरणी झालेल्या पिकांची मशागत करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना चांगली संधी मिळाली त्यानंतर पाऊस सुरू झाला पिके डोलायमान दिसत आहेत.

नदी नाले तलाव विहिरी मात्र कोरड्याच
**************

भोकर तालुक्यात चालू वर्षाच्या खरीप हंगामात जुन महिन्यात साधारण पाऊस होता जुलै महिन्यातही पाऊस साधारणच राहिला संततधार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले खरीप पिके बहरली आहेत मात्र नदी नाले तलाव विहिरींना अद्यापही पाणी साठलेले नाही तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या सुधा प्रकल्पात देखील अत्यल्प पाणीसाठा आहे भरभुशी,किनी,आमठाणा,कांडली यासह तालुक्यातील तलावामध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा असून अनेक तलाव अद्यापही कोरडेच आहेत तालुक्यातील नद्यांना एकही पूर अध्याप पर्यंत आला नाही शेतांच्या बाहेर पाणी निघालेच नाही पिकांना पुरेल एवढाच पाऊस झाल्याने भविष्यातील पाणीसाठा कसा होणार जुलै महिना संपत आलेला आहे याबाबत मात्र चिंता वाटू लागली आहे

भोकर तालुक्यात 353 मी.मी.सरासरी पाऊस
****************

भोकर तालुक्यातील पावसाची वार्षिक सरासरी 963 मिलिमीटर आहे चालू वर्षी 25 जुलै अखेर तालुक्यात सरासरी 353.40 मिलिमीटर पाऊस झाला आज पर्यंत झालेल्या सरासरीच्या 92 टक्के पाऊस झाला तर वार्षिक सरासरीच्या 36 टक्के पाऊस पडला भोकर मंडळात 408 मिलिमीटर,मोघाळी मंडळात 315 मिलिमीटर ,मातुळ मंडळात 338 मिलिमीटर ,किनी मंडळात 349 मिलिमीटर पाऊस झाला जुन महिन्यामध्ये काही मंडळात अधिक पाऊस झाल्याने त्या भागातील पिके चांगली बहरली होती काही मंडळात अत्यल्प पाऊस होता त्या भागातील पिके जोमाने वाढ झालेली नव्हती जुलै महिन्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू झाल्याने खरीप पिके चांगल्या प्रकारे झाले असून पिकांची वाढ जोमाने होत आहे पिकांना लागेल एवढाच पाऊस चालू वर्षी पडत असून जुलै महिना संपत येत आहे तरी नदी नाल्यांना पूर आले नाहीत तलावामध्ये पाणी साठलेले नाही मोठ्या तलावात देखील अत्यल्प पाणीसाठा आहे त्यामुळे भविष्यात पाणीसाठ्याची चिंता भेडसावणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button