हिंगोली जिल्ह्याला भुकंपाचा धक्का..
हिंगोली जिल्ह्याला भुकंपाचा धक्का..
वसमत.प्रतिनिधी.–आज दि. 10 जुलै 2024 रोजी हिंगोली शहर व हिंगोली जिल्ह्य़ातील सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत. असे आवाहन मा. जिल्हाधिकारी हिंगोली यांनी केले आहे. काही महिन्यांपूर्वी असाच भुकंपाचा धक्का हिंगोली जिल्ह्य़ाला बसला होता. अशाप्रकारे वारंवार बसणारे धक्के नागरिकांना भयभीत करीत असुन शासन पातळीवर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.