विजयशेठ दहिवाळकर यांची अध्यक्षपदी निवड…
विजयशेठ दहिवाळकर यांची अध्यक्षपदी निवड…
नेवासा प्रतिनिधी-नेवासा येथील श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर समिती अध्यक्षपदी जेष्ठ समाजसेवक, प्रसिद्ध सराफ मा.विजयशेठ दहिवाळकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य ग्रामीण सोनार संघटनेचे अध्यक्ष लाड सोनार समाजाचे नेते मा.श्री.मधुकरराव मैड यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या मंदीर सुशोभीकरण व मंदीर बांधकामास मा.मधुकरराव मैड यांनी भेट देऊन पाहणी केली व मा.मधुकरराव मैड यांनी मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी यांचे कार्य कौतुकास्पद असुन मंदिर अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील काळात मंदिर कामाची माहीती घेऊन संघटनेच्या वतीने तन मन धनाने सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळेस मा.प्रकाशशेठ बोकन, मा.रमाकांतशेठ मैड, कृष्णाशेठ डहाळे, देवीदासशेठ अंबिलवादे, श्रीकांतशेठ डहाळे, विकासशेठ डहाळे, सजंयभाऊ अंबिलवादे, विनायक लोळगे, विनायक अंबिलवादे, शंका अंबिलवादे, भाऊसाहेब माळवे, बाळासाहेब दिगंबरशेठ अंबिलवादे, रूषिकेशशेठ डहाळे, गणेशशेठ देडगावकर, गिरीधरशेठ डहाळे.मिरी. नारायणराव डहाळे.शेवगाव, प्रकाशशेठ डहाळे, शंकरराव अंबिलवादे , अतुल सोनार, राहुलशेठ सोनार( मैड ), दिलीपशेठ उदावंत तसेच समाजातील अनेक समाजबांधव उपस्थित होते.