अभिनेते अशोक कुलकर्णी यांची नेवासा फाटा येथे भेट…
अभिनेते अशोक कुलकर्णी यांची नेवासा फाटा येथे भेट…
नेवासा प्रतिनिधी– हिंदी मराठी चित्रपटात अनेक भूमिका साकारणारे प्रसिद्ध चित्रपट सिनेअभिनेते अशोक कुलकर्णी हे सपत्नीक छत्रपती संभाजीनगरला जात असतांना नेवासा फाटा येथील सिनेअभिनेते चंद्रशेखर कडू-पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.
अभिनेते अशोक कुलकर्णी यांनी चित्रपट क्षेत्रात एकूण सहा भारतीय भाषेत अभिनय केला असून त्यात मराठी, हिंदी, गुजराथी, भोजपुरी, कोकणी भाषेत चिञपट केलेले आहे. गजनी चित्रपटामध्येही त्यांनी अभिनय केलेला आहे. त्यांनी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आमिर खान, जैकी श्रॉफ, अमिताभ बच्चन,
गुलशन ग्रोव्हर, देवानंद यांच्याबरोबरही अभिनय केलेला आहे.तसेच मराठी मालिका जय शंकर, जय योगेश्वरमध्ये त्यांनी श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारलेली आहे.यावेळी नेवासा फाटा येथील अभिनेते चंद्रशेखर कडु पाटील, सकाळ चे पत्रकार अमोल मांडण, मराठा सुकाणु समितीचे अध्यक्ष गणेश झगरे, माजी सभापती राजेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते.