दूध मूल्य आयोगाची स्थापना करा – डॉ. अशोकराव ढगे
दूध मूल्य आयोगाची स्थापना करा – डॉ. अशोकराव ढगे
नेवासा प्रतिनिधी – नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे श्री सिद्धेश्वर डेअरी समोर छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर या महामार्गावर दूध ओतून शेतकऱ्यांनी आंदोलन केले.भारतातील इतर राज्यात केरळ, पंजाब, हरियाणा येथे दुधाला प्रति लिटर रुपये ४० रुपये भाव दिला जातो.तथापि महाराष्ट्रात मात्र प्राप्त स्थितीत दुधाला प्रति लिटर २७ रुपये हा तुटपुंज्या दर दिला जातो.त्यासाठी दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी अशी मागणी आंदोलनाच्या वेळी माजी कुलगुरू कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांनी केली.याप्रसंगी दूध संकलन केंद्राचे चेअरमन बापूसाहेब डावखर, दुग्ध उत्पादक संदीप फंड, राजेंद्र उदे, वामन खंडागळे, संजय डावखर, काकासाहेब मते, सोमनाथ खंडागळे, शंकर डावखर, शिवाजी मते, शिवप्रसाद मांढरे, स्वागत चव्हाण, यश डावकर आदी शेतकरी उपस्थित होते.आज महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादक शेतकरी संकटात आहे.
त्यासाठी दूध मूल्य आयोगाचे संघटन करून त्यामध्ये शेतकऱ्याचे प्रतिनिधी, दुग्ध शास्त्रज्ञ, महाराष्ट्र शासनाचे सचिव, यांचा समावेश करावा आज एक लिटर दूध उत्पादन करण्यासाठी ३० ते ३२ रुपये खर्च येतो.त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही.तोट्या मधील व्यवसाय शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.त्यासाठी दूध भेसळ करणारा वर कठोर कार्यवाही व्हावी शहरात मात्र दूध चढ्या दराने विकले जाते.
तेव्हा हा मलिदा कोण खातो याचेही संशोधन व्हावे प्रति ५ रुपये लिटर थकलेले अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी ही यावेळी दुग्ध उत्पादक शेतकरी व चेअरमन बापूसाहेब डावखर यांनी केली. ”जय जवान जय किसान” शेतकरी संघटनेचा विजय असो दुधाला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.शेतकऱ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन गोदाकाठी प्रवरासंगम परिसरात उभारण्यात येईल असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला.