आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशेती विषयीसरकारी योजना

पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना लक्ष्मी दर्शन न झाल्याने, शेतकऱ्यांची विहीर कागदावरच

पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना लक्ष्मी दर्शन न झाल्याने, शेतकऱ्यांची विहीर कागदावरच…

गुडसूर (वार्ताहर) येथील शेतकऱ्यांनी विहीर कामासाठी उदगीर पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना लक्ष्मी दर्शन न झाल्यामुळे शेतकऱ्यांची विहीर कागदावरच राहिल्याने याबाबतची चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की उदगीर तालुक्यातील गुडसूर या गावातील शेतकरी नागेश गणपतराव नवाडे यांनी 14/02/2024 रोजी पंचायत समितीकडे विहिरीसाठी रीतसर प्रस्ताव दाखल केला या बाबतीत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री. प्रा. शाम डावळे सरांनी फोन करून या कामाचे वर्क ऑर्डर 18/02/2024 रोजी देण्यात आली पण या पुढील प्रोसिजर म्हणजे प्रत्यक्ष काम चालू करण्याची परवानगी देण्यासाठी संबंधित शेतकरी एक ते दोन महिने पंचायत समितीला फेऱ्या मारल्या पण तेथील एका कर्मचाऱ्यांनी सांगितले की आपण सांगितलेली रक्कम (आर्थिक व्यवहार) केल्याशिवाय आपणास मंजुरी मिळणार नसल्याचे सांगितले आणि झाले ही तसेच प्रस्ताव दाखल करून चार महिने झाले पण विहीर कामाची मंजुरी संबंधित शेतकऱ्याला मिळालीच नाही यामुळे शेतकरी नागेश गणपतराव नवाडे यांनी 20/06/2024 रोजी लातूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करून संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे याबाबतीत उपविभागीय अधिकारी उदगीर, तहसीलदार उदगीर, यांनाही या बाबतीत लेखी निवेदन देण्यात आले आहेत तसेच शेतकरी नागेश गणपतराव नवाडे हे आपल्या तालुक्याचे आमदार तथामंत्री संजय भाऊ बनसोडे यांच्याकडे ही न्याय मागणार असल्याची सांगितले कारण राज्य शासनाकडून (Magel Tyala Vihir Yojana 2024) मागेल त्याला विहीर देण्याचे धोरण आहे पण उदगीर पंचायत समितीकडून मात्र लक्ष्मी दर्शन शिवाय विहीर देत नसल्याबाबत शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button