आपला महाराष्ट्रधार्मिक वार्ता
जात्यावरील ओव्या
🔸🔹 जात्यावरील ओव्या 🔹🔸
**********
🌹 हळदीच्या ओव्या 🌹
जात्यावरील ओवी
पहिली माझी ओवी गं जात्यावर पुजुया
चला चला गं सवाष्णींनो हळदकुंकू वाहू या
दुसरी माझी ओवी गं सुपारी त्यास बांधू या
खुंटा माझा घट्ट गं त्यास धरुन फिरवू या
तिसरी माझी ओवी गं हळकुंड च्या हळदीला
ओली हळद लावा गं प्रिंस नवरदेवाच्या अंगाला
चौथी माझी ओवी गं जगतजेत्या परमेश्वराला
उष्टी हळद लावा गं मुलीच्या गोऱ्या अंगाला