वकीलावर जीवघेणा हल्ला करणारा फरार आरोपी जेरबंद…
वकीलावर जीवघेणा हल्ला करणारा फरार आरोपी जेरबंद…
नेवासा प्रतिनिधी- दिनांक ०२/१२/२०२३ रोजी ॲड. प्रसाद दिनकर गर्जे रा.वडुले ता.नेवासा यांनी दिलेल्या जबाबावरुन नेवासा पोलीस स्टेशन येथे रजी.नं. ११२०/२०२३ मा.द.वि. कलम ३०७.३२६ प्रमाणे आरोपी गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यातील प्रभाकर एकनाथ गर्जे, वसंत एकनाथ गर्जे, गीता प्रभाकर गर्जे, शितल बसंत गजे, सिताबाई एकनाथ गर्जे, रंजना अर्जुन आतकरे एकुण ८ आरोपी पैकी ६ आरोपी नेवासा पोलीसांनी अटक करुन प्रोसीजर प्रमाणे अटक आरोपीस न्यायालयात हजर केले होते.त्यातील आरोपी एकनाथ महादु गर्जे व अर्जुन मच्छीद्र आतकरे दोन्ही रा.वडुले ता. नेवासा हे फरार होते. त्यांचा वेळोवेळी गावात नातेवाईकांकडे तसेच इतर संभाव्या ठिकाणी वेळोवेळी शोध घेतला असता ते मिळुन येत नव्हते.आरोपी विरुध्द सी.आर.पी.सी. ७३ प्रमाणे स्टॅण्डींग वारंट काढून, कलम ८२ प्रमाणे आरोपीचा जाहीरनामा प्रसिध्द करुन, कलम ८३ अन्वये फरार आरोपी यांचे नावे असलेली स्थावर मालमत्ता जप्त होण्याची कारवाई केली असता आरोपी एकनाथ महादु गर्जे हे पोलीस स्टेशनला हजर झाले. परंतु अर्जुन मच्छींद्र आतकरे हे कायद्याला न जुमनता फरार राहीले. फरार आरोपीच्या मुस्क्या आवळणेकरीता उपविभागीय पोलीस अधीकारी सुनिल पाटील शेवगाव यांनी सुचना दिल्याने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी एक तपास पथक तयार केले.
दिनांक २१/०६/२०२४/ रोजी सायंकाळी ०६/०० वा. चे सुमारास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना फरार आरोपीच्या वास्तव्याबाबत गोपणीय माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तातडीने तपास पथक प्रमुख पो.उप.निरीक्षक विकास पाटील व त्यांचे सोबत पो.हे.कॉ.कुसळकर, पो.ना.गांगुर्डे, पो.ना.काळोखे, पो.शि.शेळके, पो.शि.फाटक, पो.शि.धायतडक यांना योग्य त्या सुचणा व मार्गदर्शन करुन रवाना केले.तपास पथकाने मिळालेल्या माहीती प्रमाणे भातकुडगाव शिवार ता.शेवगाव येथे मोठ्या चतुराईने सापळा रचुन सुमारे ७ महीन्यापासुन फरार असलेला आरोपी अर्जुन मच्छींद्र आतकरे याच्या मुस्क्या आवळण्यास पोलीसांना यश मिळाले आहे. आरोपीस तपासी अधीकारी पो. उप.निरीक्षक मनोज अहीरे यांनी अटक केली.
सदरच्या कारवाईची पोलीस अधीक्षक राकेश ओला, अति.पोलीस अधीक्षक वैभव कान्तृधर्म श्रीरामपुर, पोलीस उपअधीक्षक सुनिल पाटील शेवगाव यांनी कौतुक केले आहे.