संत ज्ञानेश्वर माऊली भक्तांनी घेतली पालकमंत्री विखे यांची भेट…
संत ज्ञानेश्वर माऊली भक्तांनी घेतली पालकमंत्री विखे यांची भेट…
नेवासा प्रतिनिधी- आज लोणी येथे नेवासा येथील ज्ञानेश्वर माऊली भक्त मंडळ यांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले .
निवेदनात असे म्हटले आहे की जो तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानला मोठा निधी मिळणार आहे.त्याचा पाठपुरावा नामदार विखे साहेबांनी केल्यामुळे त्यांचे आभार मानत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा नेवासा शहर येथे भव्य नागरिक सत्काराचे निमंत्रण यावेळी पदाधिकारी यांच्याकडून देण्यात आले.यावेळी बोलताना पालकमंत्री विखे म्हणाले की, येत्या पावसाळी अधिवेशनात निधी मंजूर करून घेऊ व त्यानंतरच तुमचा नागरी सत्कार स्वीकारू . पावसाळी अधिवेशन संपताच आम्ही नेवासा शहरवासी मिळून भव्य नागरी सत्काराचे आयोजन करणार आहोत असे याप्रसंगी शिष्टमंडळाने सांगितले.
त्याप्रसंगी नेवासा शहरातील नागरिक ॲड.कारभारी वाखुरे, भाऊसाहेब वाघ, मनोज पारखे, अशोक ताके, देविदास साळुंखे, ज्ञानेश्वर पेचे, बंडू शिंदे, राजेश कडू राजेंद्र मुथा, रमेश घोरपडे, सुनील मोरे, आदीनाथ पटारे, सचिन काळे, रामेश्वर गाडेकर आदी नेवासा शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते.