मेडिकल क्षेत्रातील नावीन्यपूर्ण व उच्च संशोधन विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे-डॉ.अशोकराव ढगे
मेडिकल क्षेत्रातील नावीन्यपूर्ण व उच्च संशोधन विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे-डॉ.अशोकराव ढगे
नेवासा प्रतिनिधी- नेवासा तालुक्यातील शिवांजली नरसिंग महाविद्यालयं पाचेगाव येथील विद्यार्थिनींना माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की विविध क्षेत्रापैकी मेडिकल क्षेत्रामध्ये प्राप्त स्थितीत उच्च व नाविन्यपूर्ण संशोधन चालू आहे ते आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधनाचे निबंध वेळोवेळी वाचून आपले ज्ञान काल सुसंगत तयार करावे.आज जगामध्ये विविध क्षेत्रात संशोधन फार मोठ्या प्रमाणात चालू आहे तथापि मेडिकल क्षेत्रात वरच्या दर्जाचे व नंबर एकचे संशोधन सुरू असल्याबद्दल डॉ.ढगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.बी.एस.सी.नर्सिंग विद्यार्थिनी प्रॅक्टिकल साठी पेशंट डॉ.ढगे यांची भेट घेतली असता संशोधनाच्या बाबतीत मेडिकल क्षेत्र सर्वात पुढे आहे त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी संशोधनाचे निबंध नवीन व ताजे वाचावे मेडिकल क्षेत्रात प्रात्यक्षिकांना प्राधान्य दिले जाते.त्या माध्यमातून मानव सेवा ही होते व स्वतःचा जीवन चरितार्थ चालतो याचेही भान नवीन पिढीने ठेवावे या प्रात्यक्षिकासाठी प्रतिका गावित, गायत्री कांबळे, संजना कोटकर, वैशाली बारपे, शुभांगी आवटे उपस्थित होत्या.यावेळी प्रत्यक्ष पेशंटनेच डॉक्टरांना मार्गदर्शन केल्याचा हा आगळावेगळा प्रयोग झाला.